जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'आता तुमचा निरोप घेतो'; 'मुलगी झाली हो' मालिकेतील अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

'आता तुमचा निरोप घेतो'; 'मुलगी झाली हो' मालिकेतील अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

'आता तुमचा निरोप घेतो'; 'मुलगी झाली हो' मालिकेतील अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

मुलगी झाली हो (mulgi zali ho letest news ) मालिकेची वेळ बदलून ती दुपारी 2 केल्यामुळे सध्या मालिका चर्चेत असतानाच आता मालिका पुन्हा एकदा एका कारणामुळे चर्चेत आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 एप्रिल- मुलगी झाली हो  (mulgi zali ho letest news ) मालिकेची वेळ बदलून ती दुपारी 2 केल्यामुळे सध्या मालिका चर्चेत असतानाच आता मालिका पुन्हा एकदा एका कारणामुळे चर्चेत आली आहे. मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणारे अभिनेते अजय पुरकर (Ajay purkar) यांनी मालिका सोडल्याचे समोर आलं आहे. सोशल मीडियावर त्यांनी याबद्दल पोस्ट लिहित माहिती दिली आहे. अभिनेते अजय पुरकर यांनी आपण मुलगी झाली हो या मालिकेतून निरोप घेत असल्याचे सांगत चाहत्यांना धक्का दिला आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलं आहे की, नमस्कार, “मुलगी झाली हो” ह्या मालिकेतून मी तुमच्या सगळ्यांचा निरोप घेत आहे. खूप मजा आली काम करताना. अनेक अनुभव आले नव्यानी. सचिन देव sir, उत्तम दिग्दर्शक आणि टीम सांभाळून काम करणारे. सुशांत पोळ, associate director उत्तम असलाच पाहिजे हे तू सिद्ध केलंस. विक्रम, सत्या, विनोद, जीतू, महादेव, राकेश, किती जणांची नावे घ्यायची? योगेश, पुन्हा एकदा आपण एकत्र काम केलं आणि खूप धम्माल पण….. तसच प्रज्ञा ….एक छान सहकलाकार आणि उत्तम व्यक्ती. रश्मी…. खूप प्रेम…छान कर काम…विशेष आभार लता श्रीधर … शादाब शेख ….संजय कोलवणकर….सर्व कॅमेरा टीम…. नेपाळ गँग…पॅनोरमा प्रॉडक्शन्स खूप खूप धन्यवाद.. रोहिणी निनावे ….खूप खूप धन्यवाद, कायम सगळे लक्षात रहाणार…पुन्हा लवकरच भेटू …नवीन प्रोजेक्ट घेऊन…. त्यांच्या या पोस्टवर मात्र चाहत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या मालिकेतील भूमिकेने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली होती. मात्र अशी अचानक मालिका सोडल्याने चाहत्यांनी कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे. वाचा- ‘मी कित्येक रात्री जागून काढल्या’ पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्याची पोस्ट अजय पूरकर यांनी दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित पावनखिंड (Pavankhind Movie) चित्रपटामध्ये बाजीप्रभुंची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यांचा शेर शिवराज हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. सध्या ते सिनेमाच्या प्रमोशनात व्यस्थ आहेत. प्रेक्षक पुन्हा त्यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

मागच्या काही दिवसांपासून मुलगी झाली हो मालिका किरण माने प्रकरण असेल किंव मध्येच मालिका बंद होणार असल्याच्या कारणानरून चर्चेत आहे. मात्र चॅनलने यावर स्पष्टीकरण देत मालिका बंद होणार नसून मालिकेची वेळ दुपारी 2 वाजता केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सर्वांना त्यांची लाडकी मालिका दुपारी पाहता येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात