मुंबई, 16 मे- माझी तुझी रेशीमगाठ
( majhi tujhi reshimgaath serial ) या मालिकेतून नेहा काही दिवसांसाठी लंडनला गेलेली आहे. नेहा लंडनला गेली असल्याने यश परीची काळजी घेत आहे. नुकताच परीचा बेस्ट फ्रेंड ओजसच्या वाढदिवसाच्या दिवशी परी आणि यशने त्यांच्या घरी हजेरी लावली. नेहा जशी इतरांच्या मदतिला धावून जाते अगदी त्याच पद्धतीने यशने देखील ओजसच्या
( krishna mahadik ) बर्थडे पार्टीला शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परीदेखील त्याच्या या वागण्यावर खुश झालेली पाहायला मिळाली. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून परी आणि ओजसची चांगली गट्टी जमलेली दाखवण्यात आली आहे. परीचा बेस्ट फ्रेंड ओजस स्टार किड्स आहे. त्याचे वडील देखील अभिनेते आहेत. आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहे.
कृष्णाचे वडील अभिजित महाडिक हे देखील अभिनेते
परीचा खास मित्र ओजसची भूमिका कृष्णा महाडिक
( krishna mahadik ) या बालकलाकाराने साकारली आहे. माझी तूझी रेशीमगाठ ही कृष्णाने अभिनित केलेली पहिलीच मराठी मालिका आहे. या मालिकेतून प्रसिद्धी मिळालेल्या कृष्णाला नुकतेच पेटीएम च्या जाहिरातीत झळकण्याची संधी मिळाली. कृष्णाचे वडील अभिजित महाडिक
( abhijit mahadik ) हे देखील अभिनेते आहे.
वाचा-
'शेवटची वॉर्निंग, पवार साहेबांविषयी बोललीस तर..' केतकीवर सविता मालपेकर भडकल्या
प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा मालिकेच साकारत आहेत महत्त्वाची भूमिका
अभिजित महाडिक यांनी हिंदी मराठी मालिकांमधून लहान मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा या लोकप्रिय मालिकेतून ते आयपीएस विनायक माने यांची भूमिका साकारताना दिसत आहेत. नवे लक्ष्य, जय जय स्वामी समर्थ, स्वराज्यजननी जिजामाता, सोन्याची पावलं, स्पेशल पोलीस फोर्स, नमक ईस्क का, मोलकरीण बाई, डॉ बाबासाहेब आंबेडकर अशा मालिकांमधून अभिजित महाडिक यांनी विविधांगी भूमिका साकारलेल्या आहेत.
कृष्णा देखील परीसारखा सोशल मीडिया स्टार
वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत कृष्णाला देखील अभिनयाची आवड निर्माण झाली. या दोघांनी गेल्या वर्षभरापासून अनेक री्स व्हिडिओ सादर केले आहेत. सोशल मीडियावर यांचे रील्स नेहमी चर्चेत असतात. कृष्णा देखील परीसारखा सोशल मीडिया स्टार आहे. यामुळेच त्याला मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. सध्या परीप्रमाणे कृष्णा देखील त्याच्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.