जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Ashadhi Wari: 'मला तुझ्याकडून काहीच नको...' अभिनेता भरत जाधवची पंढरपूरच्या विठुरायाला अनोखी साद

Ashadhi Wari: 'मला तुझ्याकडून काहीच नको...' अभिनेता भरत जाधवची पंढरपूरच्या विठुरायाला अनोखी साद

Ashadhi Wari: 'मला तुझ्याकडून काहीच नको...' अभिनेता भरत जाधवची पंढरपूरच्या विठुरायाला अनोखी साद

Ashadhi Wari: मराठमोळा अभिनेता भरत जाधवने (Bharat Jadhav) नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. या अभिनेत्याने आपल्या अनोख्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घातली आहे. सध्या हा अभिनेता चित्रपटांपासून दूर असला तरी नाटक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 8 जुलै-   मराठमोळा अभिनेता भरत जाधवने   (Bharat Jadhav)  नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. या अभिनेत्याने आपल्या अनोख्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घातली आहे. सध्या हा अभिनेता चित्रपटांपासून दूर असला तरी नाटक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे. अभिनेत्याने नुकतंच आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत पंढरपूरच्या विठुरायाला (Ashadhi Wari) हळवी साद घातली आहे. सर्वसामान्य लोक असो किंवा कलाकार सध्या प्रत्येक भक्ताला माऊलीच्या दर्शनाची ओढ लागली आहे. कित्येक दिवसांची पायपीट करत भक्त पंढरपुरात दाखल होत आहेत. टाळ-मृदूंगाच्या गजरात अनेक कलाकारसुद्धा वारीत सहभागी होत आहेत. तसेच अनेक कलाकार आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पंढरपूरच्या विठुरायाला साद घालत आहेत. असंच काहीसं अभिनेता भरत जाधवने केलं आहे. भरत जाधव सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सतत काही ना काही पोस्ट करून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असतो. अशातच आता अभिनेत्याने खास विठुरायासाठी लिहलेली पोस्ट चर्चेत आली आहे. अभिनेत्याने आपला एक सुंदर स्केच शेअर करत ही पोस्ट लिहली आहे. हा सुंदर स्केच संतोष अडसूळ या आर्टिस्टने रेखाटला आहे. भरत जाधव पोस्ट- भरत जाधवने पोस्टमध्ये लिहलंय, ‘‘मला तुझ्याकडून काहीच नको…मला तू दिलेले चिरंतन देणे वेगळेच आहे..!! नको तुझे ज्ञान नको तुझा मान। माझें आहे मन वेगळेंची।।१।। नको तुझी भुक्ती नको तुझी मुक्ती। मज आहे विश्रांती वेगळीच।।२।। चरणी ठेऊनी माथा विनवितो सावता। ऐका पंढरीनाथा विज्ञापना।।३।। #पंढरीचीवारी

जाहिरात

**(हे वाचा:** Ashadhi Wari: नाचू वारीचे रंगी! शिवलीला पाटील घालतायत फुगडी; शेअर केले वारीतील आनंदाचे क्षण ) नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात अभिनेता भरत जाधवने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर छाप उमटवली आहे. भरत जाधव सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. अनेकदा ते त्यांच्या कामासंदर्भात पोस्ट शेअर करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांसोबत नेहमी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असतात.भरत जाधव यांनी आजवर अनेक मराठी नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आपल्या विनोदी अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात