मुंबई, 4 एप्रिल- सोनी मराठीवरील**(Sony marathi)** इंडियन आयडलच्या मंचावर अशोक सराफ**( ashok saraf)** यांनी हजेरी लावली आहे. यावेळी त्यांनी महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेला धुमधडाका या सिनेमातील ‘वख्या विख्खी वुख्खू’ या डायलॉगचा एका किस्सा सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. आजही धुमधडाका सिनेमा म्हटलं की, अशोक सराफ यांचा ‘वख्या विख्खी वुख्खू’ हा डायलॉग समोर येतो आणि हासायला भाग पाडतो. अशोक सराफ यांनी या डायलॉगमागची कथा नेमकी कशी सुचली याची आठवण इंडियन आयडलच्या मंचावर सांगितली आहे. ते म्हणाले की, शरद तळवळकर जेव्हा बागेत पाणी देत असतात तेव्हा अशोक सराफ यांची एंट्री होते. काय माळी बुवा, एवढं म्हणताच अशोक सराफ यांनी तोंडात धरलेला पाईप आत घशामध्ये अडकतो. तेव्हा तिथे त्यांना ठसका लागतो. पुढे हेच ऍडिशन घेऊन त्यांनी ‘वख्या विख्खी वुख्खू’ हातवारे करून म्हणण्याचा प्रयत्न केला.हा डायलॉग चित्रपटातून सुपरहिट झाला आणि पुढे अशोक सराफ यांना देखील या भूमिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. अर्थात चित्रपटातील हा डायलॉग इतका लोकप्रिय होईल याचा देखील कोणी विचार केला नव्हता. वाचा- ‘मम्मी मला खूप काही बोलावसं वाटतंय पण..‘आईच्या निधनानंतर अभिनेत्याची भावुक पोस्ट आजही तोंडात पाईप, हातात काठी आणि ‘वख्या विख्खी वुख्खू’ हा डायलॉग आला की अशोक सराफ यांचा चेहरा समोर येतो आणि हासायला भाग पाडतो. अशोक सराफ यांचा आशी ही बनवाबनवी मधील हा माझा बायको पर्वती हा देखील डायलॉग तितकाच लोकप्रिय झाला आहे.
महेश कोठारे दिग्दर्शित धुमधडाका सिनेमात निवेदिता सराफ, सुरेख राणे, सरोज सुखटणकर, शरद तळवलकर, प्रेमा किरण, जयराम कुलकर्णी, अशोक सराफ असे दिग्गज कलाकार चित्रपटाला लाभले. हा चित्रपट सुपरहिट ठरला.

)







