मुंबई, 3एप्रिल- कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सोन्याची पावलं’ या मालिकेने कमी काळात प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारावर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसतात. मालिकेत दुष्यंतची अभिनेता आदित्य दुर्वे ( aditya durve ) याने साकारली आहे. आदित्य दुर्वेच्या आभिनयाचे नेहमीच प्रेक्षकांकडून कौतुक होत असतं. आदित्य दुर्वेवर नुकताच दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या आईचे निधन झालं आहे. सोशल मीडियावर त्यानं आईसाठी एक भावुक पोस्ट केली आहे व सोबत तिच्यासोबतचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. आदित्य दुर्वेनं आईसोबतचे फोटो शेअर करत म्हटलं आहे की, मम्मी, मला खूप काही बोलावसं वाटतंय पण आता काहीच बोलता येत नाही, फक्त एवढंच म्हणेल की तू फार लवकर सोडून गेलीस, मी तुला कधी सांगितलं नाही, परंतु तुझा हा अभिनेता मुलगा तुझ्यावर खूप प्रेम करतो. भावपूर्ण श्रद्धांजली आई मला माहित आहे तू कायम माझ्या सोबत असणार आहेस, अशी भावुक पोस्ट आदित्य दुर्वेने सोशल मीडियावर शेअर करत मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलेब्सनी कमेंट करत त्याच सांत्वन केलं आहे. वाचा- ‘तुझ्या माझ्या संसाराला..’ मालिकेत बिग बॉस फेम अभिनेत्रीची होणार एंंट्री आदित्या दुर्वेन करिअरची सुरूवात मॉडेलिंगपासून केली आहे. मॉडेलिंग करत असताना त्याला हिंदी मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. येथूनच त्याचा अभिनयाचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला.लाईफ ओके या वाहिनीवरील कॉमेडी क्लासेस मध्ये आदित्यनं छोटी भूमिका साकारली होती.
यानंतर त्याला मराठी मालिका दिल दोस्ती दुनियादारीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. ही त्याची मराठीतील पहिली मालिका होती.त्यानंतर तो स्टार प्रवाह वाहिनीवरील मंडळ भारी या मालिकेत दिसला. आता सध्या तो कर्लस मराठीवरील ‘सोन्याची पावलं’ या मालिकेत दिसत आहे.

)







