जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' मालिकेत बिग बॉस फेम अभिनेत्रीची होणार धमाकेदार एंट्री, कोण आहे ती?

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' मालिकेत बिग बॉस फेम अभिनेत्रीची होणार धमाकेदार एंट्री, कोण आहे ती?

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' मालिकेत बिग बॉस फेम अभिनेत्रीची होणार धमाकेदार एंट्री, कोण आहे ती?

झी मराठीवरील ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेमध्ये सध्या रंजक घटना घडामोडी घडताना दिसत आहेत. आता मालिकेत मराठी बिग बॉस फेम अभिनेत्रीची (veena jagtap ) एंट्री होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 3 एप्रिल- झी मराठीवरील ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेमध्ये सध्या रंजक घटना घडामोडी घडताना दिसत आहेत. आता या मालिकेबद्दल एक बातमी समोर आली आहे. लवकरच मालिकेच एक नवीन एंट्री होणार आहे. मराठी बिग बॉस फेम अभिनेत्रीची (veena jagtap ) मालिकेत एंट्री होणार असल्याची माहिती समोर आली आहे. एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबद्दलच एका पोर्टलंन माहिती शेअर करत म्हटलं आहे की, ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेमध्ये बिग बॉस फेम अभिनेत्री वीणा जगतापची एंट्री होणार आहे. मालिकेत ती रेवा दीक्षित ही भूमिका साकारताना दिसणार आहे. प्रोमोमध्ये तर तिला पाठमोरं दाखवण्यात आलं आहे. वाचा- वयाच्या 63व्या वर्षी नीतू कपूर यांनी दिली नोराला टक्कर! थक्क करणारा डान्स VIDEO राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेद्वारे वीणाने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिच्या पहिल्याच मालिकेतील भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. यानंतर तिला बिग बॉस मराठीच्या घरानं खरी ओळख दिली. आई माझी काळुबाई या मालिकेत ती दिसली होती. आता ती या मालिकेत नवीन भूमिकेत दिसणार आहेत. चाहते वीणाल नवीन भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

जाहिरात

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेमध्ये गुळपोळी गावातील देशमुख कुटुंबामध्ये एकत्र कुटुंब पद्धती आहे. या कुटुंबांमध्ये चार पिढ्या एकत्र नांदत असतात. आता या कुटुंबामध्ये शहरात वाढलेली आदिती सिद्धार्थची बायको म्हणून देशमुख कुटुंबीयांची सून म्हणून घरात आली आहे. तर तिकडे मालिकेचा नायक असलेला सिद्धार्थ हा अमेरिकेला जाण्यासाठी धडपड करत आहे. या मालिकेमध्ये आपल्याला बऱ्याच दिवसानंतर अभिनेता हार्दिक जोशी हा दिसला आहे. मालिकेचे कथानक सध्या वेगळ्या वळणावर येऊन ठेपलेले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात