जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'काहींच्या मते अभिनेता असणं म्हणजे फक्त....' सोहम बांदेकरची पोस्ट चर्चेत

'काहींच्या मते अभिनेता असणं म्हणजे फक्त....' सोहम बांदेकरची पोस्ट चर्चेत

'काहींच्या मते अभिनेता असणं म्हणजे फक्त....' सोहम बांदेकरची पोस्ट चर्चेत

‘नवे लक्ष्य’ या मालिकेसाठी सोहम बांदेकरला पुरस्कार मिळाला. यानंतर सोहमनं सोशल मीडियावर आई-वडिलांसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. सध्या त्याची ही पोस्ट ( soham bandekar latest post ) चांगलीच चर्चेत आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 4 एप्रिल- रविवारी स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा अभिनेता सोहम बांदेकर(  soham bandekar ) याला देखील पुरस्कार मिळाला. ‘नवे लक्ष्य’ या मालिकेसाठी त्याला हा पुरस्कार मिळाला. यानंतर सोहमनं सोशल मीडियावर आई-वडिलांसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. सध्या त्याची ही पोस्ट ( soham bandekar latest post ) चांगलीच चर्चेत आली आहे. सोहम बांदेकर याने ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. सोहमची ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेसाठी त्याला काल पहिला पुरस्कार देखील मिळाला. त्याच्यासाठी तर ही आनंदाची बातमी आहेच, शिवाय सोहमचे आई- वडीला म्हणजे आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्यासाठी देखील ही कौतुकाची बाब आहे. आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सोहमनं मनोरंजन विश्वात पार्दपण केलं आहे. पुरस्कार मिळताच सोहमनं आईसोबतचा एका फोटो शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत. वाचा- डिस्ने स्टार लाँच करणार मराठी ब्लॉकबस्टर चित्रपटांची नवी वाहिनी ‘प्रवाह पिक्चर' सोहमनं इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलं आहे की,‘‘काहींच्या मते अभिनेता असणं म्हणजे फक्त तुम्ही. तुमच्या भावना, तुमचे हावभाव, तुमची उपस्थिती. पण खरं तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांबद्दल आणि वातावरणाबद्दलही ते तितकंच लागू होतं. वाचा- ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्रीनं दिली गोड बातमी, लवकर होणार आई धन्यवाद आई बाबा, मी सतत शिकत राहिन. दररोज काही तरी नवीन शिकण्याचा प्रयत्न असेल. मी कुटुंबासोबत होणाऱ्या विविध मीटिंगमध्ये उपलब्ध नसतो हे समजून घेतल्याबद्दल सर्व कुटुंबियांचे आभार असं म्हणत त्याने सर्वांचे देखील आभार मानले आहे.‘‘सोहमच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलेब्स देखील कमेंट करत त्याचे अभिनंदन व कौतुक करत आहेत. केदार शिंदे यांनी म्हटलं आहे की, आईच्या डोळ्यातलं कौतुक लाजवाब. You deserve it Soham. खरंच सोहमनं शेअर केलेल्या फोटोमध्ये आपल्या मुलाबद्दल आईच्या डोळ्यातलं कौतुर दिसून येतं.

जाहिरात

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ ही सोहमची पहिली मालिका आहे. यात सोहम पीएसआय जय सुवर्णा दीक्षित ही भूमिका साकारताना दिसतो. या मालिकेतील त्याच्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून नेहमीच कौतुक झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात