• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • एकता कपूरच्या मालिकांपेक्षाही जास्त ट्विस्ट आहेत या मराठी मालिकेत

एकता कपूरच्या मालिकांपेक्षाही जास्त ट्विस्ट आहेत या मराठी मालिकेत

एकता कपूरच्या मालिकांमध्ये काहीही घडतं. मृत माणसंही जिवंत होतात. तसंच काहीसं मराठी मालिकांत घडायला लागलंय.

  • Share this:
मुंबई, 15 फेब्रुवारी : झी मराठीवरील 'तुला पाहते रे' या मालिकेमधील विकिशाचं म्हणजेच विक्रांत आणि ईशा यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होती. लग्नसोहळाही धूमधडाक्यात झाला. अगदी सिनेमॅटिक. सर्व प्रेक्षकांना ज्या लग्नाचे वेध लागले होते तो नवीन वर्षातील पहिलाच शाही लग्नसोहळा धुमधडाक्यात संपन्न झाला. खरं तर सगळं कसं गोड गोड चालू होतं. प्रेक्षकांना कंटाळा आला होता, हे टीआरपी रेटिंगवरून लक्षात आलं होतं. गेल्या आठवड्यात ही मालिका पहिल्या पाचमधून बाहेर पडली होती. आता अचानक मालिकेनं पूर्ण अनपेक्षित वळण घेतलंय. विक्रांत सरंजामेचं खरं रूप समोर आलंय. विक्रांतचं अगोदर राजनंदिनीशी लग्न झालं होतं. आता सरंजामेंची सगळी संपत्ती फक्त आईसाहेब आणि जयदीपच्या नावावर असते. खरं तर सरंजामे इंडस्ट्री सांभाळण्याचं, वाढवण्याचं काम विक्रांतनंच केलेलं असतं. मग तरीही संपत्ती त्याच्या नावे का नाही, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे विक्रांत आणि आईसाहेबांचं नातं काय, हेही प्रश्न सध्या फेसबुकवर, इतर सोशल मीडियावर फिरतायत. कदाचित या मालिकेची चर्चा व्हावी म्हणूनच हा आटापिटा सुरू आहे. आता विक्रांत सरंजामेला ईशा ही राजनंदिनीचा पुनर्जन्मच आहे, हे विक्रांतला सगळ्यांना दाखवायचंय. त्यामुळे सगळी संपत्ती तिच्या नावे झाल्यावर ती विक्रांतलाच मिळेल, अशी त्याची गणितं आहेत. त्यासाठी त्यानं ईशाशी लग्न केलंय. ईशाला आॅफिसमध्ये आणायला तो यशस्वी होतो. आता पुढच्या भागांमध्ये विक्रांत असं वातावरण निर्माण करेल की हळूहळू लोकांना ईशाच राजनंदिनी असल्याचं वाटायला लागणार, हाच विक्रमचा डाव आहे. सध्या सोशल मीडियावर विक्रांत हा सरंजामेंचा जावई की मुलगा अशाही चर्चा रंगतायत. काहींच्या मते राजनंदिनी ही आईसाहेबांची मुलगी आणि विक्रांत जावई आहे. एकूणच तुला पाहते रे मालिका एकता कपूरच्या अनेक अतर्क्य मालिकांच्याच वाटेनं चालायला लागलीय, असं दिसतंय. #FitnessFunda : रणवीर सिंग वर्कआऊटसोबत 'हे'ही न चुकता करतो
First published: