मुंबई, 5 नोव्हेंबर- अयोध्येतील (Ayodhya) रामलीलेमध्ये 'अंगद' बनून लोकांचं मनोरंजन करणारे गायक, अभिनेते आणि भाजप खासदार मनोज तिवारी (Manoj Tiwari) हे राजकारण आणि भोजपुरी (Bhojpuri) चित्रपटसृष्टीतील मोठं नाव आहे. तिवारी हे स्वतःच्या दुसऱ्या लग्नाबाबत जेव्हा उघडपणे बोलले होते, त्यावेळी ते वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आले होते. भोजपुरी स्टार मनोज तिवारी यांनी 2012 मध्ये त्यांची पहिली पत्नी राणी (Rani Tiwari) पासून घटस्फोट घेतल्यानंतर 8 वर्षांनी त्यांची मोठी मुलगी जिया (Jiya) हिच्या सांगण्यावरून दुसरं लग्न केलं. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव सुरभी (Surabhi) आहे. मनोज तिवारी यांना दोन मुली आहेत.
View this post on Instagram
मनोज तिवारी यांच्या पहिल्या पत्नीचं नाव राणी तिवारी आहे. राणी आणि मनोज यांना जिया नावाची मुलगी आहे. जिया तिच्या वडिलांच्या खूप जवळ आहे. टाइम्स ऑफ इंडिया ला दिलेल्या मुलाखतीत मनोज तिवारी यांनी सांगितले होते की, 'राणीसोबतचे माझे नाते संपून जवळपास 10 वर्षे झाली आहेत, परंतु तरीही आमचे नाते चांगले आहे. माझी मुलगी जिया हिच्या संपर्कात मी आहे. जिया ही राणीसोबत मुंबईत राहते.'
राणी आणि जिया मुंबईतील हसमुख परिसरात एकत्र राहतात. या परिसरात राजकुमार राव, विकी कौशल, कश्मिरा शाह, प्राची देसाई आणि बॉलिवूड (Bollywood) आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील (television industry) इतर बरेच लोक राहतात. मनोज तिवारी यांनी सांगितले की, त्यांनी हा फ्लॅट राणी आणि जियाला दिला आहे.
मनोज तिवारी यांनी त्यांच्या मुलाखतीत त्यांची दुसरी पत्नी सुरभीबद्दलही मोकळेपणानं मत व्यक्त केलं होतं. ते म्हणाले, 'गेल्या लॉकडाउनमध्ये (एप्रिल 2020) सुरभीसोबत लग्न केलं. सुरभी त्यांचे प्रशासकीय काम पाहत असे. सुरभी एक गायिका आहे आणि तिने मनोज तिवारी यांच्यासोबत एका म्युझिक व्हिडिओमध्ये गाणं गायलं आहे. मनोज तिवारी यांनी आपल्या मुलाखतीत पुढे सांगितलं होतं की, 'माझी मुलगी जियाने मी सुरभीसोबत लग्न करावं, असं सांगितलं. जिया आणि सुरभी एकमेकांसोबत खूप कम्फर्टेबल आहेत.
(हे वाचा:दिवाळीत हात भाजल्यानंतरही खिशात हात ठेऊन बिग बीनी केलं होतं शूटिंग; लोकांना वाटल)
दरम्यान, मनोज तिवारीची पहिली पत्नी राणी ही सध्या पंजाबी गायक एकम बावा याला डेट करत असल्याचं वृत्त येत आहे. राणी तिवारी निर्माता अरुण तिवारी (Arun Tiwari) यांची बहीण आहे. क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याचा बायोपिक 'एमएस धोनी' (MS Dhoni) या चित्रपटाचे अरुण तिवारी हे निर्माता होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Manoj tiwari