मुंबई, 08 डिसेंबर : बॉलिवूडचे प्रतिभावान अभिनेते मनोज बाजपेयी यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पद्मश्री मनोज बाजपेयी यांच्या आई गीता देवी यांचे निधन झाले आहे. अभिनेत्याची आई गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होती. पण आठवड्याभरापूर्वी गीता देवी यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र गीता देवी यांचे आज सकाळी म्हणजेच गुरुवारी निधन झाले.
मनोज बाजपेयी यांची आई गीता देवी यांनी गुरुवारी सकाळी 8.30 वाजता दीर्घ आजारानंतर दिल्लीतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांचे वय 80 वर्षे होते. मनोज वाजपेयींच्या आईच्या निधनाची बातमी अशोक पंडित यांनी ट्विटरवर दिली आहे. त्यानंतर त्यांच्या निधनावर चाहते आणि कलाकार शोक व्यक्त करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गीता देवी यांच्या प्रकृतीत काही दिवसांपूर्वी सुधारणा दिसून आली होती. त्यांनाही डॉक्टरांच्या देखरेखीखाली बरे वाटत होते. मात्र त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती ढासळू लागली आणि आज अखेर त्यांनी शेवटचा स्वास घेतला. मनोज यांची आई हॉस्पिटलमध्ये दाखल असताना ते आईला भेटायला यायचे. शुटिंगमधून वेळ काढून मनोज आईच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात येत असे.
हेही वाचा - shah rukh khan: 'पठाण'चं पोस्टर रिलीज झाल्यावर शाहरुखचे चाहते नाराज; नेमकं काय आहे कारण?
दिल्लीच्या रुग्णालयात सुरू होते उपचार
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज बाजपेयी यांची आई गीता देवी आजारपणामुळे गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. गेल्या एका आठवड्यापासून गीता देवी यांच्यावर दिल्लीतील पुष्पांजली मेडिकल सेंटर आणि मॅक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
Our heartfelt condolences to you and your entire family @BajpayeeManoj on the sad demise of your Aadarniya mother . ओम शांति ! 🙏
— Ashoke Pandit (@ashokepandit) December 8, 2022
बॉलिवूडमध्ये मनोज वाजपेयींनी आपलं नाव अजरामर करून ठेवलं आहे. मनोरंजन विश्वामध्ये त्यांनी आजवर अनेक नावीन्यपूर्ण भूमिका करून लोकप्रियता मिळवली आहे. केवळ चित्रपटच नाही तर वेब सिरिजच्या दुनियेत देखील त्यांनी नाव कमावलं आहे. अलीकडेच त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. 'सत्या' मधला भिकु म्हात्रे ते आताचा फॅमिली मॅन अशा त्याच्या सगळ्या भूमिकांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. आज त्याच्या आईचे निधन झाले असून त्याने मोठा आधार गमावला आहे. चाहते त्यांच्या या दुःखात सहभागी असून आईच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.