मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘त्याच्या चुकीची शिक्षा मी भोगतोय’; कोरोनासंक्रमित मनोज वाजपेयी संतापला

‘त्याच्या चुकीची शिक्षा मी भोगतोय’; कोरोनासंक्रमित मनोज वाजपेयी संतापला

अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) याला देखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र ही लागण त्याला इतर कोणाच्या तरी निष्काळजीपणामुळं झाली असा दावा त्यानं केलं आहे.

अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) याला देखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र ही लागण त्याला इतर कोणाच्या तरी निष्काळजीपणामुळं झाली असा दावा त्यानं केलं आहे.

अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) याला देखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र ही लागण त्याला इतर कोणाच्या तरी निष्काळजीपणामुळं झाली असा दावा त्यानं केलं आहे.

मुंबई 17 मार्च: कोरोना विषाणूचं (COVID 19) संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळं आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) याला देखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र ही लागण त्याला इतर कोणाच्या तरी निष्काळजीपणामुळं झाली असा दावा त्यानं केलं आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मनोजचा ‘सायलेंस: कॅन यू हिअर इट’ या नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरच्या वर्च्युल लॉन्चींगच्या वेळी त्यानं आपल्या करोनो संक्रमणावर भाष्य केलं. तो म्हणाला, “माझी तब्येत आता स्थिर आहे. मी लवकर बरा होतोय. इतर कोणी निष्काळजी पणा दाखवला त्यामुळं मला कोरोनाची लागण झाली. कृपया कोरोनाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करा अन्यथा त्याची शिक्षा तुमच्यासोबतच इतरांनाही भोगावी लागेल.”

अवश्य पाहा - ‘गटबाजीत पडू नका काम करा अन् पैसे घ्या’; राजपाल यादवनं केली बॉलिवूडची पोलखोल

मनोज येत्या काळात द फॅमिली मॅन या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळं सध्या या सीरिजचं चित्रीकरण थांबवण्यात आलं आहे. शिवाय चित्रीकरणाच्या वेळी त्याच्यासोबत असलेल्या इतर सर्व सहकलाकारांना देखील क्वारंटिनमध्ये ठेवलं गेलं आहे. मनोज पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतरच पुन्हा एकदा चित्रीकरण सुरु केलं जाईल.

महाराष्ट्रातील कोरोनास्थिती चिंताजनक

महाराष्ट्रात कोरोनाच्या वेगाने होणाऱ्या दैनंदिन रुग्णवाढीबाबत गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली. राज्यातील परिस्थिती गंभीर बनू लागली असून तातडीने नमुना चाचण्या वाढवण्याची गरज आहे. कोरोनाचे संकट टळलेले नसून कोणताही निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो, हे महाराष्ट्रातील स्थितीवरून स्पष्ट होते. त्यामुळे अन्य राज्यांनीही दक्ष राहावे, असा इशारा निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के. पॉल यांनी दिला.

First published:

Tags: Corona, Manoj Bajpayee, Vaccinated for covid 19