मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘गटबाजीत पडू नका काम करा अन् पैसे घ्या’; राजपाल यादवनं केली बॉलिवूडची पोलखोल

‘गटबाजीत पडू नका काम करा अन् पैसे घ्या’; राजपाल यादवनं केली बॉलिवूडची पोलखोल

गेली 23 वर्ष बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या राजपालला अद्याप एकही चांगला मित्र या सिनेसृष्टीनं दिलेला नाही, असा खेद त्यानं व्यक्त केला. (I dont know whos my friend)

गेली 23 वर्ष बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या राजपालला अद्याप एकही चांगला मित्र या सिनेसृष्टीनं दिलेला नाही, असा खेद त्यानं व्यक्त केला. (I dont know whos my friend)

गेली 23 वर्ष बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या राजपालला अद्याप एकही चांगला मित्र या सिनेसृष्टीनं दिलेला नाही, असा खेद त्यानं व्यक्त केला. (I dont know whos my friend)

मुंबई 17 मार्च: राजपाल यादव (Rajpal Yadav) हा बॉलिवूड सिनेसृष्टीतील सर्वाधिक विनोदी अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्यानं आजवर ‘चुप चुपके’, ‘फिर हेरा फेरी’, ‘भुल भुलैया’, ‘भागंम भाग’ (‘Chup Chupke’, ‘Phir Hera Pheri’, ‘Bhul Bhulaiya’, ‘Bhagam Bhag’) यांसारख्या अनेक सुरहिट चित्रपटांतून प्रेक्षकांना खळखळवून हसवलं आहे. मात्र गेली 23 वर्ष बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या राजपालला अद्याप एकही चांगला मित्र या सिनेसृष्टीनं दिलेला नाही, असा खेद त्यानं व्यक्त केला. (I dont know who's my friend)

राजपाल यादवंनं नुकताच आपला 50 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्तानं इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यानं आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी त्यानं बॉलिवूडमध्ये कोणीही कोणाचा मित्र नसतो असा अनुभव सांगितला. तो म्हणाला, “बॉलिवूड हे अत्यंत व्यवसायिक क्षेत्र आहे. इथं कोणी कोणालाही फायद्याशिवाय मदत करत नाही. जो पर्यंत तुम्ही यशाच्या शिखरावर असता तो पर्यंत तुमच्या आसपास गर्दी असते. अन् एकदा तुमच्या करिअरला उतरती कळा लागली की मग तुम्ही सेलिब्रिटी किड असला तरी तुम्हाला कोणी विचारत नाही. मी जवळपास 23 वर्ष बॉलिवूडमध्ये काम करतोय. 100 च्या वर चित्रपटांमध्ये काम केलं आहे. परंतु एकही चांगला मित्र या इंडट्रीनं अद्याप मला दिलेला नाही. अर्थात माझा कोणी शत्रू देखील नाही. मी आजवर अजातशत्रू सारखा वागत आलो आहे. मी चित्रपट निवडताना केवळ व्यक्तिरेखा पाहातो अन् मला किती मानधन मिळणार याबद्दल विचारतो. तो कुठल्या ग्रुपमधील आहे. स्टार किड आहे का? त्याच्यासोबत काम केल्यावर कोणी माझ्यावर नाराज होईल का? असे विचार मी करत नाही. सर्वांसोबत मैत्री ठेवा अन् कोणालाही नाराज करु का? हे तत्वज्ञान मी बॉलिवूडमध्ये वापरलं आहे.”

अवश्य पाहा - वाढदिवसाच्या दिवशीच आमिर खानचा संन्यास! Tweet करून दिली 'ही' बातमी

" isDesktop="true" id="531404" >

राजपाल यादवनं 1999 साली अजय देवगणच्या दिल क्या करे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात त्यानं वॉचमनची लहानशी भूमिका साकारली होती. त्यानंतर मस्त, जंगल, चांदनी बार, रोड, चोर मचाए शोर यांसारख्या 100 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये त्यानं विनोदी कलाकाराची भूमिका साकारली. ‘चुप चुपके’, ‘फिर हेरा फेरी’, ‘भुल भुलैया’ आणि ‘भागंम भाग’ या चित्रपटांमुळं तो खऱ्या अर्थानं लोकप्रिय झाला. आज तो बॉलिवूडमधील आघाडिचा विनोदवीर म्हणून ओळखला जातो.

First published:

Tags: Bollywood, Bollywood News, Film star, Rajpal yadav, Star celebraties