मुंबई, 16 जुलै : सोशल मीडियावर अनेक फोटो, व्हिडीओ, डान्स, गाणी व्हायरल होत असलेली पहायला मिळतात. सोशल मीडियामुळे कोण कधी व्हायरल होईल हे काही सांगता येत नाही. गतवर्षी एका मुलीच्या व्हायरल गाण्यानं अनेकांना वेड लावलेलं पहायला मिळालं. हे व्हायरल गाणं म्हणजे ‘मणिके मागे हिथे’ (Manike Mange Hite song). हे गाणं तुफान व्हायरल झालं. त्यामुळे या गाण्याची गायक-संगीतकार योहानी (Yohani)देखील प्रसिद्धी झोतात आली. तेव्हापासून श्रीलंकेतील गायिका योहानी सतत चर्चेत असते. अशातच योहानी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. योहानी यावेळी एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. योहानी ही गायिका तर आहेच याशिवाय ती एक उत्तम रॅपरही आहे. त्यामुळे श्रीलंकेत तिला रॅप प्रिन्सेसही म्हणतात. नुकतंच एका मुलाखतीत योहानीनं अभिनेता रणवीर सिंगसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे योहानी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. योहानीला रणवीचा गल्ली बॉय सिनेमा खूपच आवडला. त्यातील रॅप सॉंग खूप आवडले. रॅपसोबत रणवीर ची भूमिकाही तिला खूप आवडली. त्यामुळे तिला रणवीरसोबत काम करायचं आहे. याशिवाय योहानीनं रॅपर बादशाहाचाही उल्लेख केलेला पहायला मिळाला. बादशाहसोबत रॅप करायला आवडेल असंही योहानीनं म्हटलं. हेही वाचा - ‘रंग माझा वेगळा’ फेम साईशा ज्यांना भेटते त्यांच्याबरोबर करते असं काही; अभिनेत्री बरोबरचा तो VIDEOव्हायरल योहानी पुढे म्हणाली की, मी श्रीलंकेत अनेक रॅप केले आहेत आणि मी हिंदीमध्ये एक रॅप करण्यास उत्सुक आहे. बादशाह आणि रणवीर सिंगसोबत काम करायला मला आवडेल. रणवीर, बादशाह आणि योहानी सारखे डायनॅमिक स्टार कधी एकत्र दिसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, योहानीला ‘मणिके मागे हिथे’ गाण्याचं मराठी वर्जन गाण्यासाठी खूप विनवणी गेली जात आहे. चाहते तिला वारंवार याविषयी विचारत असतात. त्यामुळे कधी मराठी वर्जन ऐकायला मिळेल, हा प्रश्न कायम तिला विचारलेला पहायला मिळतो. योहानी ही श्रीलंकेची असून तीनं गेल्या वर्षी ‘मणिके मागे हिथे’ हे गाणं गायलं होतं. तिच्या या गाण्याच्या साऊंडवर इन्स्टाग्रामवर अनेक रील बनवले. हळूहळू हे गाणं चांगलंच प्रसिद्ध झालं. अनेक मोठमोठे कलाकारही या गाण्याच्या प्रेमात पडलेले पहायला मिळाले. इंटरनेट सेंन्सेशन बनलेल्या योहानीला हळू हळू रिअॅलिटी शोमध्ये गेस्ट म्हणून यायच्या संधी मिळत आहेत. योहानीनं सलमान खानच्या बिग बॉसमध्येही हेजेरी लावली होती. यावेळी तिनं ‘मणिके मागे हिथे’ गाणं म्हटलं आणि सलमानलाही हे गाणं म्हणण्यास सांगितलं. दिवसेंदिवस तिची लोकप्रियता वाढत चाललेली पहायला मिळत आहे.