कलाकार कायम या अन् त्या कारणाने ट्रोल होत असतात. कधी कपडे, भूमिका कधी भाषा अशा सगळ्यावर ट्रोलर्सच बारीक लक्ष असतं.
बेज स्किन रंगाचा कोल्ड शोल्डर क्रॉप टॉप तिने घातला आहे आणि याच लुकमुळे तिच्यावर निशाणा साधला जात आहे.
'तुम्हाला साडीच शोभून दिसते कृपया असे कपडे घालू नका तुम्ही महाराष्ट्राची कन्या आहात' अशी विनंती काही चाहते करत आहेत.
तर एका युजरने मर्यादा सोडून 'दीपिका पदुकोण आणि तू लग्नानंतर जास्त वाया गेलात' असं सरळ सरळ तिला कमेंट करून म्हणलं आहे.
मानसी बऱ्याच कारणांनी कायम चर्चेत असते. ती अनेकदा पारंपरिक मराठमोळ्या अवतारात प्रेक्षकांसमोर येते.