मुंबई, 02 डिसेंबर: झी मराठीवरील नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली मालिका ‘मन झालं बाजिंद’ (Man Zal Bajind) प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. या मालिकेवर आणि त्यातील व्यक्तिरेखांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. कृष्णा (Krishna) आणि राया (Raya) ही जोडी देखील प्रेक्षकांची अगदी आवडती जोडी बनली आहे. नुकतीच ही जोडी हनिमूनवरून परतली आहे. मग काय कृष्णाला उलटी करताना पाहून गुली मावशीला कृष्णाला डोहाळे लागलेत की नाहीत याचा प्रश्न पडला आहे. प्रेक्षकांना देखील गुली मावशीला जो प्रश्न पडला आहे तोच प्रश्न पडला आहे. कृष्णाला डोहाळे लागल्याची बातमी घरात देखील सर्वांना समजली आहे. घरात आनंदाचे वातावरण आहे. मात्र कृष्णा गरोदर नसल्याचे राया आजीला सांगतो. तिकडे रंजना मात्र आनंदात आहे. तिनं यासाठी खूप तयारी केली आहे. कृष्णा गरोदर असल्याचे गुली मावशीला मात्र आवडलेले नाही. त्यासाठीच ती कृष्णाचे मुल अॅबॉट करण्याचा सल्ला देते. वाचा : प्रियांकाच्या चुकीमुळे अभिनेत्यास दुखापत अन् झाला रक्तबंबाळ ; अभिनेत्रीला कोसळलं रडू, video viral कृष्णा गरोदर असल्याचा गैरसमज रंजनाला गुलीचं खरं रूप दाखवणार का ? असा देखील प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. यामुळे गुली मावशीचं खरं रूप सर्वांसमोर येणार का, तसेच तिनं आतापर्यंत केलेली कारस्थानं देखील सर्वांसोर येणार का असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात आहेत. या सर्व प्रश्नाचे उत्तरे येणार भागातच समोर येणार आहे.
पण रंजनाला जेव्हा कृष्णा गरोदर नसल्याचे सत्य समजेल तेव्हा तिची अवस्था कशी होणार हे देखील येणाऱ्या भागात समजेल.झी मराठीने यासंबंधी प्रोमो आऊट केला आहे. कृष्णा जरी गरोदर नसली तरी प्रेक्षकांना मात्र हा ट्वीस्ट चांगलाचा आवडलेला आहे. कमेंट करून देखील प्रेक्षकांनी कृष्णाचं अभिनंदन केलं आहे.
नुकतेच कृष्णा आणि रायाने पांडू सिनेमातील एका गाण्यावर भन्नाट डान्स केला होता. या दोघांच्यातील केमेस्ट्रि सर्वांना खूपच आवडते. सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत असलेल्या आणि सोशल मीडियावर लाखाहुन अधिक व्ह्यूव्ज मिळवलेल्या पांडू चित्रपटातील ‘बुरुम बुरुम’ या गाण्यावर कृष्णा (Krishna) आणि राया (Raya) यांनी भन्नाट डान्स करत रील सादर केले आहे. त्यांचा हा जबरदस्त डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.