नुकतंच अक्षयची बहीण श्रद्धा केळकरचं लग्न पार पडलं. या लग्नसोहळ्यात अक्षयचे खास मित्र उपस्थित होते. हा सोहळा अक्षय आणि त्याच्या बहिणीसाठी फारच अनोखा ठरला.
अक्षय केळकरच्या बहिणीने बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी 'तू तयारी सोडून जात आहेस मात्र येताना माझ्या रुखवतीत ट्रॉफी घरी घेऊन ये असं वचन त्याच्याकडून घेतलं होतं.अभिनेत्याने ते वचन पूर्ण करत बहिणीचा मान राखला आहे.