मुंबई, 23 जुलै- ‘मन उडू उडू’ झाली ही मालिका प्रचंड लोकप्रिय मालिका ठरली आहे. तरुण वर्गामध्ये या मालिकेची प्रचंड क्रेझ आहे. परंतु ही मालिका आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. दरम्यान सर्वानांच इंद्रा आणि दीपूच्या लग्नाची प्रचंड उत्सुकता होती. या दोघांना नवरा-नवरीच्या रुपात पाहण्यासाठी चाहते आतुर होते. आता चाहत्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. कारण इंद्रा-दीपूच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे. मालिकेतील सानिका अर्थातच अभिनेत्री रीना मधुकरने आपल्या सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे. झी मराठीवरील ‘मन उडू उडू झाली’ ही मालिका सुरुवातीपासून प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली होती. या मालिकेचं टायटल सॉन्गसुद्धा अतिशय लोकप्रिय झालं होतं. त्यावर अफाट रील्स बनवण्यात आले होते. तसेच इंद्रा आणि दीपू यांची हटके केमिस्ट्री प्रेक्षकांना फारच भावली होती. इंद्रा आणि दीपूने आपल्या प्रेमासाठी अनेक अग्निपरीक्षा दिल्या आहेत. त्यांनी अनेक संकटाना एकमेकांच्या साथीने मात दिली आहे. त्यांनतर आता मालिकेत त्यांच्या लग्नाचा ट्रॅक सुरु आहे. नुकतंच अभिनेत्री रीना मधुकरने आपल्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. हा फोटो इंद्रा आणि दीपूच्या लग्नातील आहे. रीनाने यामध्ये दीपूची बहीण सानिकाची भूमिका साकारली आहे. दीपूने आपल्या लग्नामध्ये लाल रंगाची कांजीवरम साडी नेसली आहे. अभिनेत्री साऊथ इंडियन लुकमध्ये दिसून येत आहे. तर इंद्रानेसुद्धा साऊथ इंडियन टच देत कुर्ता आणि लुंगी नेसली आहे. दोघेही लग्नाच्या या आउटफिट्समध्ये फारच सुंदर दिसत आहेत. दीपूचा लुक हा काहीसा हृताच्या खऱ्या लग्नातील लुकशी मिळताजुळता आहे.
(हे वाचा: Indra Deepu Wedding: इंद्रा दीपूचं लग्न! हळदीचे काही निवडक क्षण आले समोर **)** तसेच अभिनेत्रीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये इंद्रा आणि दीपूची संपूर्ण फॅमिली दिसून येत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसून येत आहे. प्रेक्षकांना या एपिसोडची प्रचंड उत्सुकता लागली आहे. यांच्या लग्नासोबतच ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

)







