जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Video : सुरेखा कुडची यांनी घेतलं जोतिबाच दर्शन, पोलिसास देखील आवरला नाही अभिनेत्रीसोबत फोटो काढण्याचा मोह

Video : सुरेखा कुडची यांनी घेतलं जोतिबाच दर्शन, पोलिसास देखील आवरला नाही अभिनेत्रीसोबत फोटो काढण्याचा मोह

Video : सुरेखा कुडची यांनी घेतलं जोतिबाच दर्शन, पोलिसास देखील आवरला नाही अभिनेत्रीसोबत फोटो काढण्याचा मोह

बिग बॉस फेम अभिनेत्री सुरेखा कुडची ( surekha kudachi ) यांनी नुकतचं कोल्हापूरच्या अंबाबईचे आणि डोंगरच्या जोतिबाचे दर्शन घेतलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोल्हापूर, 31 मे- बिग बॉस फेम अभिनेत्री सुरेखा कुडची (  surekha kudachi )  यांनी नुकतचं कोल्हापूरच्या अंबाबईचे आणि डोंगरच्या जोतिबाचे दर्शन घेतलं आहे. सोशल मीडियावर सुरेखा कुडची यांचा जोतिबा दर्शन आणि अंबाबई दर्शनाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. सुरेखा कुडची यांनी नुकताच त्यांच्या इन्स्टाला एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी म्हटलं आहे की, आज खूप वर्षांनी ज्योतिबाला जायचा योग आला.. यावेळी सुरेखा कुडची यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी महिला वर्गांनी तोफा गर्दी केली. जोतिबावर डोंगरावर तर सुरेखा कुडची यांना पाहून सर्वसामान्यांसोबत एका पोलिसास देखील फोटो काढायचा मोह आवरला नाही. या पोलिसाने देखील यावेळी सुरेखा कुडची यांच्यासोबत फोटो काढून घेतला. वाचा- सिद्धू मूसेवाला यांच्यावर आज मूळगावी होणार अंत्यसंस्कार, समोर आली माहिती सुरेखा कुडची नुकत्याच “तुझ्या रूपाचं चांदण” या मालिकेत दिसल्या होत्या. या मालिकेने आता प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. या मालिकेत त्यांनी महेश्वरी पाटीलची भूमिका साकारली होती. याला प्रेक्षकांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळाला. शिवाय रानबाजार सीरीजमधील त्यांच्या भूमिकेचे कौतुक होत आहे. शुटींग या सगळ्यातून वेळ काढत त्यांनी देवदर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी देखील होती. यापूर्वी बिग बॉस विजेता विशाल निकम, विकास पाटील यांनी देखील जोतिबाचं दर्शन घेतलं आहे.

जाहिरात

अभिनेत्री सुरेखा कुडची या १९९० पासून अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी मराठीबरोबरच हिंदी सिनेमा, मालिकांतही काम करत लोकप्रियता मिळवली आहे. मराठी सिनेमांमध्ये सासुची माया, पोलिसाची बायको, भरत आला परत, खुर्ची सम्राट, तीन बायका फजिती ऐका, फॉरेनची पाटलीण यांचा समावेश आहे. आता पर्यंत त्यांनी ५० मराठी आणि हिंदी सिनेमांत काम केले आहे.याशिवाय देवयानी, रुंजी, नवरी मिळे नव-याला, चंद्र आहे साक्षीला यासारख्या मालिकांतही त्यांनी काम केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात