मुंबई, 27 ऑगस्ट : बॉलिवूडचे लोकप्रिय फॅशन डिझायनर कुणाल रावल आणि अर्पिता मेहता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. 28 ऑगस्ट 2022 रोजी दोघे विवाहबंधनात अडकणार असून लग्नापूर्वी, या जोडप्याने त्यांची प्री-वेडिंग पार्टी आयोजित केली होती. या भव्य पार्टीत अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावलेली पहायला मिळाली. या पार्टीत बी टाऊनच्या सर्व सेलिब्रिटींचा एकापेक्षा एक हटके लूकही पहायला मिळाला. मात्र या पार्टीत सगळ्यांचं लक्ष वेधलं ते म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरानं. पार्टीमध्ये या जोडीची जास्त चर्चा पहायला मिळाली सोबत त्यांचा व्हिडीओही समोर आला. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा या जोडीने पार्टीत धुमाकूळ घातला. दोघांचाही जबरदस्त डान्स व्हिडीओ समोर आला आहे. काही मिनिटांच्या या व्हिडीओनं इंटरनेटचं वातावरण गरम केल्याचं पहायला मिळालं. समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये अर्जुन-मलायका अभिनेत्रीचं थ्रोबॅक सुपरहिट गाणं ‘चल छैया छैया’ वर डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दोघांचा रोमॅन्टिक अंदाजही पहायला मिळाला.
अर्जुन कपूर आणि मलायकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीमध्येही ते कपल गोल्स देताना दिसले. हा व्हिडीओ पाहून दोघांचे चाहते खूपच आनंदी झाल्याचं दिसून आलं. अनेकांनी व्हिडीओवर भरभरुन कमेंट करत लाइक्सचाही वर्षाव केला आहे. हेही वाचा - Sonali Phogat Death: सोनाली फोगाट आणि PA सुधीर सांगवान होते पती-पत्नी? फ्लॅट नं 901 चं गूढ वाढलं दरम्यान, या पार्टीला कपूर कुटुंबातील अनेक लोक उपस्थित होते. या पार्टीला अर्जुन कपूरच्या बहिणी अंशुला कपूर, जान्हवी कपूर, शनाया कपूर, अभिनेत्याचे काका-काकू संजय कपूर, महीप कपूर आणि अनिल कपूर उपस्थित होते. तरीही अर्जुन सगळ्यांना विसरुन मलायकासोबत एन्जॉय करताना दिसला.