अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या लुक्ससाठी फारच प्रसिद्ध आहे. तिचे रोज नवे लुक्स पाहायला मिळतात. पाहा तिचे फोटो. मलायका नेहमी तिचा पाळीव कुत्रा कॅस्परसोबत मुंबईत फिरताना दिसते. प्रत्येकवेळी तिचा हटके आणि नवा लुक पाहायला मिळतो. पाऊस असो किंवा ऊन, वारा आपल्या कॅस्परसोबत ती नेहमी फिरताना दिसते. मलायकाची फॅशन केवळ पडद्यापूरती नाही तर खऱ्या आयुष्यातही तशीच हटके आहे. तिला नेहमी निरनिराळ्या ठिकाणी स्पॉट केलं जातं. मलायकाने वयाच्या ४७ व्या वर्षी स्वतःला अतिशय फिट ठेवलं आहे. मलायका लवकरच एका शोमध्ये जज म्हणून दिसणार आहे. मलायका नेहमी तिच्या योगा सेंटर बाहेरही स्पॉट होते. मलायका नेहमीच वेगळा आणि हटके लुक करण्याचा प्रयत्न करते. तिचे फोटो नेहमीच व्हायरल होताना दिसतात.