**मुंबई, 30 डिसेंबर-** ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazhi Tuzhi Reshimgath) ही मराठी मालिका अतिशय गाजत आहे. मालिकेतील श्रेयस (Shreyas) आणि प्रार्थनाची (Prarthana) जोडी आणि छोट्या परीचा निरागस अभिनय याची चर्चा घराघरात होत आहे. मालिकेत अनेक दिग्गज कलाकारांची फौज आहे. मालिकेच्या कथानकाच्या प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे.अनेकजण या छोट्या परीसाठी मालिका पाहतात. छोट्या परीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. मालिकेत नेहाची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने मालिकेशी संबंधीत एक जबरदस्त व्हिडिओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे झी मराठीने देखील हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्की हसून हसून लोटपोट व्हाय एवढे मात्र नक्की आहे. मालिकेत नेहा परीला नेहमी बाळा..बाळा.. असं म्हणताना दिसते. यालाचा अक्षय कुमारच्या बाला..बाला या गाण्याचे रूप दिल आहे. सध्या हे मजेशीर रील चाहत्यांच्या देखील पसंतीस उतरले आहे. वाचा- ‘हे केवढे रामदास पाध्ये सारखे दिसतात’ ; सोनाली पुढे विजू माने निरूत्तर विशेष म्हणजे या व्हिडिओवर खुद श्रेयस तळपदेने देखील दखल घेतली आहे. त्याने कमेंट करत म्हटले आहे की, हा..हा.. बालाचे असे हिलेरियस फ्यूजन बनवल्याबद्दल खूप खूप आभारी.. चाहत्यांकडून देखील यावर कमेंटचा पाऊस पडत आहे. अनेकांनी स्माईलीच्या इमोजी पोस्ट केल्या आहेत.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका सध्या एका नव्या वळणावर आहे.सध्या मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि परांजपे याचं खरं रूप सगळ्यांसमोर येत आणि नेहाशी त्यांचं लग्न मोडतं. हे आपण सर्वांनीच पाहिलं. परंतु आता मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे. यश आपली ओळख सांगण्याआधीच नेहाला सत्य समजणार आहे. त्यामुळे या दोघांच्या नात्यात कोणतं नवं वादळ येणार पाहणं महत्वाचं ठरणार आहे.