मुंबई, 19 जानेवारी- मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेता म्हणून ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांना ओळखलं जातं. महेश कोठारे यांनी अभिनयापासून ते दिग्दर्शनापर्यंत सर्व क्षेत्रात आपला ठसा उमठवला आहे. चित्रपटांमधील त्यांची खास शैली सर्वांनाच भुरळ पाडते. तसेच महेश कोठारे यांचा ‘डॅम इट..’ हा डायलॉग कधीच कुणी विसरु शकत नाही. हा डायलॉग कानी पडताच डोळ्यांसमोर महेश कोठारे उभे राहतात. नुकतंच महेश कोठारे यांनी आपला जीवनप्रवास सांगणारं एक पुस्तक प्रकाशित केलं. विशेष म्हणजे या पुस्तकाचं नाव ‘डॅम इट आणि बरंच काही’ असं आहे. या निमित्ताने अभिनेत्री आणि सून उर्मिला कोठारे ने महेश कोठारेबाबत एका महत्वाच्या गोष्टीचा खुलासा केला आहे. मराठीमधील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कानेटकर अभिनेते महेश कोठारे यांची सून आणि आदिनाथ कोठारेची पत्नी आहे. उर्मिला नेहमीच आपल्या कुटुंबाविषयी संवाद साधतांना दिसून येते. उर्मिला कोठारे आणि महेश कोठारे यांचं फारच छान बॉन्डिंग आहे. एखाद्या बापलेकीप्रमाणे ते राहतात. महेश कोठारे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये ते स्पष्टपणे दिसून आलं. यावेळी कार्यक्रमात उर्मिलाने पती-अभिनेता आदिनाथ कोठारेसोबत कार्यक्रमाचं सूत्रसंचालनदेखील केलं. यावेळी उर्मिला प्रचंड उत्साहात दिसून आली. **(हे वाचा:** Riteish Deshmukh: भावंडांप्रमाणे तुही राजकारणात का नाही? रितेश देशमुखने अखेर सांगितलं कारण ) नुकतंच उर्मिला कोठारेने लोकमत फिल्मी या वेबसाईटला मुलाखत दिली होती. यावेळी तिला सासरे महेश कोठारे यांच्याबाबत काही प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी अभिनेत्रीने अगदी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. या मुलाखतीमध्ये उर्मिलाला विचारण्यात आलं होतं. महेश कोठारे यांच्यामधील एक महत्वाचा गुण कोणता? यावर उत्तर देत उर्मिला म्हणाली, ‘लोकांपर्यंत आत्तापर्यंत हा गुण पोहोचलेला आहे. परंतु तो अत्यंत महत्वाचा गुण आहे. आणि तो गुण म्हणजे त्यांची एनर्जी.. त्यांच्या उत्साह.. ते सेटवर किंवा कोणत्याही ठिकाणी आले की प्रचंड एनर्जी घेऊन येतात. ते आल्यानंतर त्याठिकाणचं वातावरण अगदी बदलून जात, उत्साहित होतं’. त्यामुळे हा गुण फारच महत्वाचा असल्याचं उर्मिला म्हणाली. सोबतच उर्मिला म्हणाली, ‘फारच कमी लोकांना माहिती असेल की, त्यांच्याकडे आणखी एक महत्वाची गोष्ट आहे. आणि ती गोष्ट म्हणजे, ‘त्यांना त्यांच्यावर आलेल्या संकटांवर अत्यंत सराईतपणे हसता येतं. आणि ही गोष्ट फारच महत्वाची आहे. त्यामुळेच ते आज इथंपर्यंत पोहोचले आहेत. आणि त्यांची ही गोष्ट प्रत्येकांनाच शिकण्यासारखी आहे’.
महेश कोठारे यांच्या डॅम इट आणि बरंच काही या पुस्तकाराचा प्रकाशन सोहळा दादर येथील श्री शिवाजी मंदिरमधील भव्य सभागृहात संपन्न झाला. देवेंद्र फडणवीस यांनी रिमोटचे बटण दाबून अनोख्या शैलीत ‘डॅम ईट आणि बरंच काही’ पुस्तकाचे प्रकाशन केलं. किरण शांताराम, सचिन पिळगावकर, निवेदिता सराफ, मच्छिंद्र चाटे, जयवंत वाडकर, रामदास पाध्ये, उमेश जाधव आदी मंडळींनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मात्र या सगळ्यांमध्ये अभिनेते अशोक सराफ यांची अनुपस्थिती प्रामुख्यानं लक्षात आली. पण अशोक मामा कार्यक्रमाला न येण्यामागचं कारण निवेदिता सराफ यांनी सांगितलं.त्यांची तब्येत ठीक नसल्याने ते या कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाहीत.