मुंबई, 12 जानेवारी : धडाकेबाज कलाकार आणि निर्माता दिग्दर्शक असलेल्या महेश कोठारे यांचं 'डॅम इट आणि बरंच काही' हे आत्मचरित्र बुधवारी (11 जानेवारी) मुंबईत प्रकाशित झालं. या निमित्तानं बोलताना महेश कोठारे यांना त्यांचा जीवलग मित्र आणि प्रत्येक सिनेमातील हुकमी एक्का लक्ष्मीकांत बेर्डेची आठवण आली. लक्ष्या आजही माझ्यासोबत असल्याचं मला वाटतं, अशी भावना त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.
आत्मचरित्रात काय आहे?
बालकलाकार ते अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि मालिका निर्माता असे यशाचे प्रत्येत टप्पे महेश कोठारे यांनी सर केले आहेत. धडाकेबाज कलाकार आणि निर्माता दिग्दर्शक असलेल्या महेश कोठारे यांच्या आयुष्यातले आजवर कुणालाही माहिती नसलेले प्रसंग या आत्मचरित्रात आहेत. कौटुंबिक जबाबदारी, अनेक मानअपमान, मराठी चित्रपट सृष्टीचा पडता काळ, चित्रपट निर्मितीमधून मिळालेले अनपेक्षित वळण. सहा दशकात संपर्कात आलेले कलाकार, त्याचबरोबर त्यांच्या लाडक्या लक्ष्मीकांत बेर्डे सोबतच्या अनेक आठवणी या पुस्तकात वाचायला मिळणार आहेत.
लक्ष्मीकांत बेर्डे यांची पहिली ओळख, दोघांनी एकत्र केलेले काम आणि लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आयुष्यातील शेवटचे क्षण हे सर्व पुस्तकात वाचायला मिळेल.आजही लक्ष्या माझ्याबरोबर आहे असं मला वाटतं, असं मत ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांनी व्यक्त केलं.
.... म्हणून अशोक मामांनी कोठारेंच्या कार्यक्रमाला येणं टाळलं; निवेदितांनी सांगितलं नेमकं कारण
डॅम इट नाव का?
महेश कोठारे यांची चित्रपट कारकिर्द 1962 साली सुरू झाली. गेल्या सहा दशकांचा चित्रपट सृष्टीचा प्रवास त्यांनी यामध्ये मांडला आहे. ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट, ऑप्टिकल साऊंड डिजिटल साऊंड आणि आता डिजिटल सिनेमा हा सगळा प्रवास या पुस्तकात वाचायला मिळेल, असं कोठारे यांनी सांगितलं.
'डॅम इट हा शब्द माझ्याशी निगडित आहे. डॅम इट आणि महेश कोठारे हे एक समीकरण आहे. या पुस्तकात डॅम इट च्या पलीकडे खूप काही आहे. म्हणून डॅम इट आणि बरंच काही नाव देण्यात आलंय,' असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Laxmikant berde, Local18, Marathi entertainment, Mumbai