बॉलिवूडचे बाजीराव मस्तानी नेहमीच काही ना काही कारणांनी चर्चेत असतात. नुकतीच या दोघांनी आयाफा अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावली. मात्र यावेळी या दोघांच्या लुकवर सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या.
दीपिकाचा फॅशन सेन्स हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. मात्र तिचा आयफा लुक पाहिल्यानंतर शादी के साइड इफेक्ट म्हणजे नेमकं काय हे तुमच्या लक्षात येईल.
रणवीर तर नेहमीच अशाप्रकारच्या अत्रंगी ड्रेसमध्ये दिसतो आणि विशेष म्हणजे त्याच्या प्रत्येक लुकची निवड दीपिका करते असं त्यानं एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यामुळे कोणाचा इफेक्ट कोणावर झालाय हे समजायला मार्ग नाही.
सुरुवातीला फक्त रणवीरच अशा लुकमध्ये दिसत असे मात्र आता मागच्या काही दिवसांपासून दीपिका सुद्धा त्याच्यासारख्याच अत्रंगी लुक्समध्ये दिसत असल्यानं 'संगतीचा परिणाम' असाच सर्वांचा सूर आहे.