मुंबई, 27 जानेवारी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार स्टार क्रिकेटर एमएस धोनी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. महेंद्रसिंग धोनीने आजपर्यंत क्रिकेट विश्वात अफाट नाव कमावलं आहे. आज पर्यंत चाहत्यांनी त्याला फक्त क्रिकेटरच्या रुपात पाहिलं आहे. परंतु एमएस धोनी आता आपल्या करिअरच्या नव्या इनिंगला सुरुवात करत आहे. धोनी आता आपल्याला निर्मात्याच्या रुपात पाहायला मिळणार आहे. एमएस धोनी निर्मित पहिल्या सिनेमाचं मोशन पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे. क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सतत आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यातील विविध अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतो. नुकतंच महेंद्रसिंग धोनीने ट्विट करत आपल्या चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं आहे. धोनीने आपल्या ट्विटर अकाउंटवर आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमाचं मोशन पोस्टर शेअर केलं आहे. या चित्रपटाची निर्मिती धोनी करत आहे. विशेष म्हणजे धोनीने आपल्या नव्या इनिंगसाठी तामिळ सिनेमाची निवड केली आहे. **(हे वाचा:** Masaba Gupta Wedding: लेक मसाबाच्या लग्नात आले व्हिव्हियन रिचर्ड्स; पहिल्यांदाच संपूर्ण कुटुंब दिसलं एकत्र ) धोनीने आपल्या ट्विटमध्ये आपल्या पहिल्या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज केलं आहे. या मोशन पोस्टरमध्ये निसर्गरम्य वातावरण दिसून येत आहे. सोबतच यामध्ये एक छोटीशी बससुद्धा दिसत आहे. हे पोस्टर रिलीज करत त्यासोबत LGM हा हॅशटॅग देण्यात आला आहे. याचा अर्थ ‘लेट्स गेट मॅरीड’ असा आहे. ‘लेट्स गेट मॅरीड’ हेच धोनी निर्मित पहिल्या सिनेमाचं नाव आहे.
We're super excited to share, Dhoni Entertainment's first production titled #LGM - #LetsGetMarried!
— Dhoni Entertainment Pvt Ltd (@DhoniLtd) January 27, 2023
Title look motion poster out now! @msdhoni @SaakshiSRawat @iamharishkalyan @i__ivana_ @HasijaVikas @Ramesharchi @o_viswajith @PradeepERagav pic.twitter.com/uG43T0dIfl
धोनी एन्टरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड या नावाने धोनीचं प्रोडक्शन हाऊस आहे. या प्रोडक्शन हाऊसच्याअंतर्गत धोनी या तामिळ चित्रपटाची निर्मिती करत आहे. धोनीने चित्रपटाची घोषणा केल्यापासूनच सर्व चाहते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
महेंद्रसिंग धोनीने चित्रपटांमध्ये पदार्पण कराव असं त्याच्या अनेक चाहत्यांना वाटत होतं. परंतु या स्टार क्रिकेटरने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवत सर्वांनाच चकित केलं आहे. धोनी निर्मित या पहिल्या तामिळ चित्रपटात तामिळ सुपरस्टार हरीश कल्याण,इवाना, योगी बाबू आणि नादिया अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे. धोनी नव्या क्षेत्रात काय कमाल दाखवणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.