बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांची लेक मसाबा गुप्ताने गुपचूप लग्नगाठ बांधत सर्वांनाच चकित केलं आहे.
मसाबाने बॉयफ्रेंड-अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत लग्न केलं आहे. सत्यदीप आणि मसाबा त्यांच्या नेटफ्लिक्स सिरीज 'मसाबा-मसाबा' दरम्यान भेटले होते.
या सिरीजमध्ये सत्यदीप आणि मसाबाने पतीपत्नीची भूमिका साकारली होती. या ऑनस्क्रीन जोडीने खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधत सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे.
विशेष म्हणजे लेकीच्या लग्नात ज्येष्ठ क्रिकेटर व्हिव्हियन रिचर्ड्सदेखील उपस्थित होते. लेकीच्या लग्नाच्या निमित्ताने नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड्स अनेक वर्षानंतर एकत्र आलेले दिसून आले.
मसाबाने आपल्या आई वडिलांसोबतचे फोटो शेअर करत पाहल्यांदाच संपूर्ण कुटुंब एकत्र आल्याचं म्हटलं आहे.
मसाबा गुप्ताचं हे दुसरं लग्न आहे. याआधी तिने मधू मंटेनासोबत झालं होतं. परंतु काहीच वर्षात त्यांचा घटस्फोट झाला होता.
तर दुसरीकडे सत्यदीप मिश्राचंसुद्धा हे दुसरं लग्न आहे. सत्यदीपने याआधी अभिनेत्री अदिती राव हैदरीसोबत लग्न केलं होतं.