जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Onkar Bhojane: ओंकार भोजनेवर चाहते नाराज; हास्यजत्रेच्या कलाकारांसोबत पाहताच म्हणाले 'ओंक्या तू गद्दार....'

Onkar Bhojane: ओंकार भोजनेवर चाहते नाराज; हास्यजत्रेच्या कलाकारांसोबत पाहताच म्हणाले 'ओंक्या तू गद्दार....'

ओंकार भोजने

ओंकार भोजने

नुकताच ओंकार हास्यजत्रेतील नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर या कलाकारांना भेटला होता. त्याने तिघांचा एक फोटो पोस्ट केला होता. आता त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 02 जुलै :  ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम तुफान लोकप्रिय आहे. या शोमधील कलाकारांनी देखील महाराष्ट्राच्या घराघरात वेगळं स्थान निर्माण केलं. आजवर अनेक कलाकारांनी हा शो सोडला आहे पण एका अभिनेत्याच्या एक्झिटवर चाहते अजूनही नाराज आहेत. त्याने हा शो सोडून अनेक दिवस उलटले असले तरी चाहते आजही त्याची आठवण काढल्याशिवाय राहत नाहीत. आता ओंकार भोजने हास्यत्रेतील कलाकारांच्या अजूनही संपर्कात आहेत. नुकताच ओंकार हास्यजत्रेतील नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर या कलाकारांना भेटला होता. त्याने तिघांचा एक फोटो पोस्ट केला होता. आता त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरल्या आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो सोडल्यानंतर ओंकारने  ‘फू बाई फू’ कार्यक्रमात एन्ट्री घेतली होती. तसेच तो एका चित्रपटात देखील दिसला होता. मात्र, हा कार्यक्रम फार काळ चालला नाही. त्यानंतर आता प्रेक्षकांनी त्याला पुन्हा हास्यजत्रेत येण्याची विनंती केली. या कार्यक्रमाचे प्रेक्षक आजही ओंकार भोजनेला शोमध्ये मिस करतात. पण आता ते शक्य नाही. आता महाराष्ट्राची हास्यजत्राच्या कलाकारांसोबत ओंकारला पाहिल्यानंतर चाहत्यांनी पुन्हा नाराजी व्यक्त केली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात प्रेक्षक आजही ओंकार भोजनेला शोमध्ये मिस करतात. अलीकडेच अभिनेत्री नम्रता संभेरावने शेअर केलेल्या पोस्टमुळे आला. नुकताच अभिनेत्री नम्रता संभेरावने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रसाद खांडेकर आणि ओंकार भोजने यांच्यासह एक फोटो शेअर केला. या फोटोवर चाहत्यांनी विविध कमेंट्स करत ओंकारला पुन्हा शो मध्ये परतण्याची विनंती केली आहे. तर काही जणांनी चिडून कमेंट केली आहे. 72 Hoorain: जेएनयू मध्ये होणार ‘72 हूरें’चं स्पेशल स्क्रीनिंग; निर्माते म्हणाले ‘…तरच दहशतवादाचं सत्य समजेल’ नम्रता संभेरावने शेअर केलेल्या फोटोवर एका युजरने ओंकार भोजनेला उद्देशून कमेंट केली आहे. यामध्ये तो नेटकरी म्हणाला की, ‘ओंक्या तू गद्दार आहेस…तू तुझ्या सगळ्या चाहत्यांबरोबर गद्दारी केलीस. आम्ही सगळे तुला खूप मिस करतो. हास्यजत्रा हा शो का सोडलास, निदान निमिशसारखं एखाद्या स्किटसाठी तरी तू यायला हवं. एकदा परत नक्की ये…आम्हाला सर्वांना तुला पुन्हा हास्यजत्रेत पाहून खूप आनंद होईल.’ अशाच आशयाच्या कमेंट्स इतर चाहत्यांनी केल्या. चाहत्यांचा होणारा संताप पाहून नम्रता संभेरावला मध्यस्थी करावी लागली.

जाहिरात

त्या चाहत्याला उत्तर देत नम्रता म्हणाली, ‘प्रत्यक्षात असे काहीच नाही, त्याला नव्या गोष्टी शिकायच्या होत्या म्हणून त्याने त्याचा मार्ग निवडला. आम्ही सर्वांनी त्याच्या निर्णयाचा आदर करत त्याला सहकार्य केले.’ अभिनेत्रीने मित्राची खंबीरपणे बाजू घेतल्यामुळे नेटकऱ्यांनी नम्रताला पाठींबा दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात