जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सुबोध भावे आणि सयाजी शिंदेंच्या जुगलबंदीची थरारक कथा; 'कालसूत्र'चा ट्रेलर प्रदर्शित

सुबोध भावे आणि सयाजी शिंदेंच्या जुगलबंदीची थरारक कथा; 'कालसूत्र'चा ट्रेलर प्रदर्शित

सुबोध भावे आणि सयाजी शिंदेंच्या जुगलबंदीची थरारक कथा; 'कालसूत्र'चा ट्रेलर प्रदर्शित

‘कालसूत्र’ या मराठी अॅक्शन थ्रीलरचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मराठीतला पहिलाच थरारक आणि रोमांचकारी Action Thriller वेब शो असून ट्रेलर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 ऑगस्ट: मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे सुबोध भावे (Subodh Bhave). सुबोध भावे हे सतत चर्चेत असतात. कोणत्याही गोष्टीविषयी बेधडकपणे बोलणारे सुबोध अशातच पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. सुबोध लवकरच डिजिटल प्लॅटफॉर्मवर एण्ट्री करणार आहे. ते ‘कालसूत्र;एक चित्तथरारक माईंड गेम’ या मराठी वेबसिरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याविषयी सुबोध भावेंनी कालच 26 ऑगस्ट रोजी पोस्टर शेअर करत आनंदाची बातमी दिली होती. अशातच आता या वेबसिरीचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘कालसूत्र’ या मराठी अॅक्शन थ्रीलरचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये सुबोध भावे एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहेत. तर सयाशी शिंदे हे जेलमध्ये असलेल्या कैदीच्या भूमिकेत दिसतायेत. टीझर जसा जसा पुढे जातोय तसा तसा सिरीजचं गूढ वाढत जाताना दिसतंय. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच शिगेला पोहचत आहे. या सिरिजमध्ये भाऊ कदमही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

जाहिरात

एक विकृत सिरियल किलर.. आणि एक कर्तबगार पोलिस अधिकारी…जिओ स्टुडिओज् घेऊन येत आहे मराठीतला पहिलाच थरारक आणि रोमांचकारी Action Thriller वेब शो.. ‘.  2023 या नव्या वर्षामध्ये ही वेब मालिका तुम्हाला पहायला मिळणार आहे. हेही वाचा -  Kailash Waghmare: ‘पावनखिंड’ फेम अभिनेत्याच्या लेकीचा नामकरण सोहळा; सेलिब्रेटी कपलने मुलीचं ठेवलं अनोखं नाव दरम्यान, सुबोध भावेंना डिजिटल प्लॅटफॉर्मवर बघण्यासाठी चाहते फारच उत्सुक आहेत. याशिवाय ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे आणि सुबोध भावे ही जोडी एकत्र पाहण्यासाठीही प्रेक्षकवर्ग उत्सुक आहे. ही मराठी वेब प्रेक्षकांच्या किती पसंतीस उतरणार हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात