मुंबई, 15 जून- छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता (Tv Actor) आणि ‘महाभारत’ (Mahabharat) फेम रुमी खान (Rumi Khan) बऱ्याच दिवसांनंतर नुकतंच ‘अलिबाबा: दास्तान-ए-काबुल’ (Alibaba: Dastaan E Kabul) या टीव्ही मालिकेत झळकला आहे. मात्र अभिनेत्यासोबत एक भयानक अपघात घडला. रुमी कारने घरी परतत असताना त्याच्यासोबत एक विचित्र अपघात घडला. गाडी चालवत असताना, अभिनेत्याला जाणवलं की त्याच्यावर काहीतरी पडत आहे.पाहूया अभिनेत्यासोबत नेमकं काय घडलं. ETimes TV शी बोलताना रु खाननं अपघाताबाबत सांगितलं. तो म्हणाला, ‘मी माझ्या कारने घरी परत जात होतो. मी घरी पोहोचणारच होतो. मात्र काहीच अंतरावर असताना मला माझ्या कारवर काहीतरी पडतंय असं वाटू लागलं. मी नशीबवान आहे की मला माझी गाडी वेळेवर थांबवता आली. मी कार थांबताच पटकन बाहेर आलो आणि पाहिलं तर एक भलामोठा झाड माझ्या कारवर पडला होता. अभिनेत्याने पुढं म्हटलं, ‘झाडाच्या जड फांद्यांमुळे गाडीचा दरवाजा आणि शिल्ड पूर्णपणे तुटली होती. देवाच्या कृपेने आणि नशिबाने मी या विचित्र अपघातात थोडक्यात बचावलो. पण, मला खूप त्रास सहन करावा लागला आहे.’’ रुमी शेवटचा टीव्ही शो ‘शेर-ए-पंजाब : महाराजा रणजीत सिंह’ 2017 मध्ये दिसला होता. आता तब्बल 5 वर्षांनंतर तो छोट्या पडद्यावर परतला आहे.मात्र त्याच्यासोबत ही विचित्र घटना घडल्याने चाहते चिंतेत आहेत. **(हे वाचा:** Deepika Padukone Health Update: शुटींगदरम्यान दीपिकाच्या हृदयाचे ठोके वाढले, तात्काळ रुग्णालयात केलं दाखल ) तब्बल 5 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतल्याबाबत अभिनेता म्हणाला, “मला नेहमीच अभिनयाची आवड आहे. मला छोट्या पडद्यापासून इतके दिवस दूर राहायचं नव्हतं. पण मी काही आव्हानात्मक भूमिकांच्या शोधात होतो. ‘अलिबाबा: दास्तान-ए-काबुल’मध्ये रुमी एक मनोरंजक भूमिका साकारणार आहे. याबाबत तो सांगतो, ‘या मालिकेत तो मुख्य पात्रांपैकी एक आहे. मालिकेत ज्याची एक काळी बाजू आहे. तो एक निर्भय सेनापती आहे जो अनेक गोष्टी करू शकतो. माझ्यात आणि माझ्या पात्रात एक साम्य आहे की आम्हा दोघांनाही घोड्यांची प्रचंड आवड आहे’.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.