मुंबई 26 जून: (
Zee Marathi) झी मराठीवरील ‘महा मिनिस्टर’ (
Maha Minister) कार्यक्रम सध्या अंतिम टप्यात येऊन पोहोचला आहे. एवढे दिवस वहिनी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होत्या तो महाअंतिम सोहळा (
Maha Minister finale) आज संध्यकाळी पार पडणार आहे. फायनलला निवड झालेल्या वहिनींमध्ये चुरस पाहायला मिळत आहे तसंच खूप खेळीमेळीचं वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे. या वहिन्यांनी त्यांच्या नवऱ्यांची खास आठवण काढत काही भन्नाट उखाणे सादर केले आहेत.
या कार्यक्रमाचा फॉरमॅट आणि पद्धत प्रेक्षकांना बरीच पसंत पडत आहे. आत्तापर्यन्त ठाणे, पनवेल, रत्नागिरी, पुणे, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक अशा विभागांमधून निवड झालेल्या वहिनींमध्ये अटीतटीचा सामना आज होणार असून कोणत्यातरी एकाच वहिनीला ही अकरा लाखाची पैठणी परिधान करायचं सन्मान मिळणार आहे. पण सध्या वहिनी सुद्धा स्पर्धेचं टेन्शन विसरून एक भन्नाट उखाणा challenge करताना दिसत आहे.
प्रत्येक वहिनी कॅमेरासमोर येऊन आपापल्या नवऱ्यांचं अजब उखाणे घेऊन नाव घेताना दिसत आहेत. ‘फेसबुक वर दिसले, इन्स्टावर भेटले, व्हाट्सअप वर पटले… आज भाजीत मीठ जास्त पडलं म्हणून सकाळीच पेटले’ असा उखाणा कोल्हापूरच्या वहिनींनी आपल्या नवरोबांसाठी घेऊन त्यांची पार बोलती बंद केली आहे तर ‘बेडवर टाकतात टॉवेल ओला, फोनवर मित्रांशी तासभर बोला… पण लादी पुसायला सांगितली तर म्हणतात झुकेगा नहीं साला’ असं पनवेलच्या वहिनी खास आपल्या नवऱ्यासाठी म्हणतात. ‘मुंगीला साखेरची हवं, पेट्रोलचे वाढले भाव, माझं दिल रिकामा गाव पण दळणाच्या डब्यावर तुमचंच नाव’ असं पुण्याच्या वाहिनी खास पुणेरी अंदाजात नवऱ्याचं नाव घेतात.
अशा एक ना अनेक पद्धतीच्या उखाण्यांची इथे अक्षरशः रेस लागली आहे हे पाहायला मिळत आहे. जिंकेल कोणीही पण वहिनी या खेळाचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत. महा मिनिस्टर हा कार्यक्रम अनेक कारणांसाठी खास ठरत आहे. होम मिनिस्टर सारखीच या कार्यक्रमात जिंकणाऱ्या वहिनीचा सन्मान पैठणी देऊन केला जाणार आहे पण ही पैठणी अत्यंत स्पेशल पद्धतीने बनवली आहे.
हे ही वाचा- Maha Minister:रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे ठरल्या 11 लाखांच्या पैठणीच्या मानकरी
दिव्यांग मुलांच्या मेहनतीतून आणि कशातून ही अकरा लाखाची पैठणी बनवली आहे. ही पैठणी कोणत्या भाग्यवान वहिनीच्या नशिबात लिहिली आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरलं. आज या कार्यक्रमच अंतिम सोहळा पार पडणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.