जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: माधुरी दीक्षित झाली गायिका, पती झाले गिटारिस्ट; नेने कुटुंबाने घरातच सुरू केला बँड

VIDEO: माधुरी दीक्षित झाली गायिका, पती झाले गिटारिस्ट; नेने कुटुंबाने घरातच सुरू केला बँड

VIDEO: माधुरी दीक्षित झाली गायिका, पती झाले गिटारिस्ट; नेने कुटुंबाने घरातच सुरू केला बँड

माधुरी दीक्षित नेनेनं (Madhuri Dixit Nene) कुटुंबातसोबतचा एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला तिने फॅमिली जॅमिंग (Family Jamming) असं नाव दिलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 डिसेंबर: लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात आपल्याला कुटुंबासोबत बराच वेळ एकत्र घालवता आला. त्यामुळे आपलं कुटुंबाशी असलेलं बॉडिंगही स्टाँग झालं. बॉलिवूडची धक धक गर्ल  माधुरी दीक्षित - नेने (Madhuri Dixit Nene) हिनेदेखील कोरोना काळात कुटुंबासोबत खूप मजा मस्ती केली. माधुरी सध्या मोठ्या पडद्यापासून जरी लांब असली तरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. तिने एक युट्यूब चॅनलही सुरू केला आहे. माधुरीच्या कुटुंबासोबतचा धम्माल मस्ती करतानाचा एक व्हिडीओ तिने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. काय आहे या व्हिडीओमध्ये? लॉकडाऊनच्या काळात माधुरीचं दीक्षितचं सगळं कुटुंब घरी होतं. तिला पती आणि मुलांसोबत भरपूर वेळ घालवता आहे. या वेळेचा नेने कुटुंबाने फारच चांगला उपयोग केलेला आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आपल्याला दिसत आहे की, त्यांच्या घरातच गाण्याची मैफल रंगली आहे. या व्हिडीओमध्ये माधुरी गाणं गाताना दिसत आहे तर तिचे पती श्रीराम नेने गिटार वाजवताना दिसत आहे. तिचा मुलगा बँड वाजवताना दिसत आहे. हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

जाहिरात

माधुरीने शेअर केलेल्या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर 12 तासांतच 5 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. बॉलिवूडमध्ये असताना माधुरीने तिचा काळ गाजवला होता. उत्तम अभिनय, बहारदार नृत्य आणि तिच्या सौंदर्यामुळे ती आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. लग्नानंतर माधुरी दीक्षित पतीसोबत यूएसएला रहायला गेली आणि बॉलिवूडपासूनही दुरावली. काही वर्षांपूर्वी तिचा मराठी सिनेमा बकेट लिस्टही प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात