जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / माधुरी दीक्षितच्या आईचं निधन, बॉलिवूडवर पुन्हा शोककळा

माधुरी दीक्षितच्या आईचं निधन, बॉलिवूडवर पुन्हा शोककळा

माधुरी दीक्षित

माधुरी दीक्षित

Madhuri Dixit Mother Death: सतीश कौशिक यांच्या निधनाच्या बातमीनंतर पुन्हा एकदा मनोरंजन सृष्टीतून दुःखद बातमी समोर आली आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 12 मार्च- सतीश कौशिक यांच्या निधनाच्या बातमीनंतर पुन्हा एकदा मनोरंजन सृष्टीतून दुःखद बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित च्या आईचं निधन झालं आहे. त्यांच्यावर वरळी येथे अंत्यसंस्कार केलं जाणार आहे.माधुरी दीक्षितच्या आई स्नेहलता दीक्षित यांचं आज सकाळी साडे आठच्या सुमारास निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी 3 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन झालं होतं. त्यांच्या निधनातून इंडस्ट्री अजूनही सावरलेली नाहीय. दरम्यान आता आणखी एक दुःखद घटना समोर आली आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या आई स्नेहलता दीक्षित यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. आईच्या जाण्याने माधुरी दीक्षित आणि तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माधुरी दीक्षित आपल्या आईच्या अतिशय जवळ होती. माधुरी प्रत्येक लहान मोठ्या गोष्टी आईसोबत शेअर करत असे. या वयातही स्नेहलता नेहमीच हसतमुख चेहऱ्याने आपल्या लेकीसोबत प्रत्येक फोटोत दिसून येत होत्या.माधुरी सतत आपल्या आईसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत असे.

News18लोकमत
News18लोकमत

माधुरी दीक्षितचे जवळचे नातेवाईक असणाऱ्या रिकु नाथ यांनी सर्वप्रथम स्नेहलता दीक्षित यांच्या निधनाची बातमी दिली होती. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माधुरी दीक्षितच्या आई सस्नेहलता आता आपल्यात नसल्याचं सांगितलं होतं. शिवाय वृद्धपकाळाने त्यांचं निधन झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्यांनतर अभिनेत्री माधुरी दीक्षितने आपल्या आईच्या निधनाची बातमी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात