मुंबई, 24 एप्रिल- सध्या ‘लॉक अप’ (Lock Upp) ची जोरदार चरचा आहे. या शोमधून सतत काही ना काही चकित करणारे खुलासे होत असतात. एकता कपूरचा (Ekta Kapoor) हा रिअॅलिटी शो ‘लॉक अप’ लोकांना आवडला असून हा शो हळूहळू शेवटच्या टप्प्यात पोहोचत आहे. वादविवाद, भांडणे, अशा गोष्टी याठिकाणी रोजच होत राहतात. शोचा प्रत्येक स्पर्धक नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. दरम्यान आता चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्री गहाना वशिष्ठने (Gehna Vasistha) शो वर गंभीर आरोप केले आहेत. ‘लॉक अप’ शोमुळे आपले चार महिने वाया गेल्याचेही तिने म्हटलं आहे. गहना वशिष्ठने एकता कपूरवर आरोप केला आहे की, ‘‘एकता कपूरची कंपनी बालाजी टेलिफिल्म्स आणि ऑल्ट बालाजी टेलिव्हिजन कलाकारांना त्यांच्या कार्यक्रमांचे आमिष दाखवतात आणि त्यांना अनेक महिने घरात बसवतात आणि सर्व काही त्यांच्या इच्छेनुसार झाले नाही तर या कलाकारांचे करार संपुष्टात आणतात. ‘लॉकअप’साठी साइन करुनसुद्धा शोमध्ये तिचा समावेश करण्यात आलेला नाही, असं गहाना वशिष्ठने म्हटलं आहे. मात्र, ऑल्ट बालाजीशी संबंधित मेकर्सनी याबाबत सध्या कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीय. अमर उजालाच्या वृत्तानुसार, ‘गहाना वशिष्ठने सांगितले की, ‘तिला डिसेंबर 2021मध्ये शोसाठी संपर्क साधण्यात आला होता. बऱ्याच चर्चेनंतर दिवसाला दीड लाख रुपयांच्या मानधनावर ठराव अंतिम झाला होता. त्यांच्यासोबत प्रोमोही शूट केल्याचं गहना म्हणाली. मात्र ठरलेल्या वेळेत आपल्याला बोलावण्यात आलं नसल्याचं आणि कंपनी वारंवार प्रश्न टाळत असल्याचंदेखील तिने सांगितलं आहे. अखेरीस कळविण्यात आलं की, तिचा करार रद्द करण्यात आला आहे. परंतु या चार महिन्याछाया कालावधीत तिला कोणतेही काम करण्यास बंदी घालण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.