प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझा (Remo D'Souza) यांना हृदयविकाराचा झटका आल्याने कोकिलाबेन रुग्णायलात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईच्या या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांना दाखल करण्यात आलं असल्याची माहिती शुक्रवारी समोर आली होती. पण ANI च्या वृत्तानुसार त्यांना ICU मध्ये भरती नाही करण्यात आलं आहे. त्यांंची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. रेमो यांच्या प्रकृतीबाबत समजताच त्यांच्या जवळचा मित्रपरिवार रुग्णालयामध्ये पोहोचला आहे. रेमो यांची पत्नी लिझेल डिसूझांचे काही PHOTO समोर आले आहेत. (फोटो सौजन्य-@remodsouza/Instagram)
शुक्रवारी रात्रीचे हे फोटो आहेत यामध्ये लिझेल यांच्याबरोबर कोरिओग्राफर-डान्सर सलमान खान देखील दिसतो आहे. (फोटो सौजन्य-Viral Bhayani)
रेमो यांच्या हृदयविकाराच्या झटक्याबाबत समजताच त्यांचा मित्रपरिवार लिझेल यांना भावनिक आधार द्यायला रुग्णायलात दाखल झाला होता. सलमानही यावेळी लिझेल यांच्याबरोबर दिसत आहे (फोटो सौजन्य-Viral Bhayani)
रेमो डिसूझा यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर येताच त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. रेमो यांची प्रकृती लवकरात लवकर ठीक व्हावी याकरता चाहत्यांकडून प्रार्थना केली जात आहे. सोशल मीडियावरही त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याबाबत प्रार्थना केली जात आहे. (फोटो सौजन्य-Viral Bhayani)
शुक्रवारी दुपारी रेमो यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांंना रुग्णालयात भरती करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार रेमो डिसूझा यांची एंजिओप्लास्टी करण्यात आली आहे आणि त्यांची प्रकृती सध्या स्थीर आहे. हृदयातील ब्लॉकेज हटवण्यासाठी त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. (फोटो सौजन्य-Viral Bhayani)
रेमोच्या हार्ट अॅटॅक बद्दल समजतात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज विचारपूस करण्यासाठी रुग्णायलात पोहोचले आहेत. दिग्दर्शक-कोरिओग्राफर अहमद खान त्यांच्या पत्नीसह रुग्णालयात पोहोचले. तर धर्मेश सर, अभिनेता आमिर अली हे देखील रुग्णालयाबाहेर दिसले होते. (फोटो सौजन्य-Viral Bhayani)