मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Vikram Gokhale : विक्रम गोखलेंच्या दातृत्वाचा 'तो' किस्सा; जेव्हा अडीच कोटीचा भूखंड केला होता दान

Vikram Gokhale : विक्रम गोखलेंच्या दातृत्वाचा 'तो' किस्सा; जेव्हा अडीच कोटीचा भूखंड केला होता दान

विक्रम गोखले

विक्रम गोखले

विक्रम गोखले उत्तम नट तर होतेच पण त्यांनी माणुसकीचा धडाही अनेक वेळा त्यांच्या कृतीतून दिला होता. त्यांना अभिनयासोबतच सामाजिक भानसुद्धा होतं. समाजातल्या विविध घटकांना वेळोवेळी विक्रम गोखले यांनी मदत केली आहे. आज त्यांच्या आठवणीत असाच एक दातृत्वाचा किस्सा जाणून घेऊया.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 26 नोव्हेंबर : अभिनेते  विक्रम गोखले आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. अनेक दशके सिनेसृष्टीत मोलाचं योगदान देणाऱ्या विक्रम गोखले त्यांच्या जाण्यानं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.  मराठी सह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे विक्रम गोखले उत्तम नट  तर होतेच पण त्यांनी माणुसकीचा धडाही  अनेक वेळा त्यांच्या कृतीतून दिला होता. त्यांना अभिनयासोबतच सामाजिक भानसुद्धा होतं.  समाजातल्या विविध घटकांना वेळोवेळी विक्रम गोखले यांनी मदत केली आहे. आज त्यांच्या आठवणीत असाच एक दातृत्वाचा किस्सा जाणून घेऊया.

अभिनेते विक्रम गोखले त्यांच्या सामाजिक जबाबदारीविषयी कायम तत्पर होते. समाजातील अनेक घटकांना त्यांनी मदत केली. त्यांचे वडील चंद्रकांत गोखले यांच्याकडून त्यांनी हा मदतीचा वसा घेतला होता.  कोरोनाने वेढलेल्या परिस्थितीतही गोखले यांनी दातृत्वाचा धडा घालून दिला होता. त्यांनी पुण्याजवळच्या नाणे गावातली आपली दोन एकर जागा दोन वेगवेगळ्या संस्थांना दान करत समाजासमोर एक आदर्श ठेवला होता.

हेही वाचा - Vikram Gokhale : विक्रम गोखले यांचं चित्रपटसृष्टीशी जुनं नातं; वडिलच नाही तर आजी-आजोबाही हाडाचे कलाकार

विक्रम गोखले यांची पुण्याजवळच्या नाणे इथे काही जमीन होती. त्यातील दोन एकर जागा त्यांनी दोन संस्थांना दिली आहे. पैकी एक एकर जागा सिंटा अर्थात सिनेमा आणि टीव्ही कलाकारांच्या संघटनेला तर एक एकर जागा अखिल भारतीय चित्रपट महामंडळाला देण्याचं जाहीर केलं होतं. या जागेवर ज्येष्ठ व निराधार कलाकारांसाठी वृद्धाश्रम काढण्याची त्यांची इच्छा होती. आज या जागेची बाजार भावानुसार किंमत जवळपास अडीच ते तीन कोटी रुपये इतकी आहे.

ही महत्वाची घोषणा करत विक्रम गोखले एका मुलाखतीत म्हणाले होते कि, ''कोरोनाच्या काळात सगळेच घटक मदत करत आहेत. ही चांगली बाब आहे. पण ती मदत तात्पुरती आहे. कायमस्वरूपी मदत व्हायला हवी. या कोरोनामुळे अनेकांचा आधार गेला आहे. अनेकांना दोन वेळचं अन्न मिळत नाही. कित्येक लोक एकटे आहेत. त्यांच्यासाठी या जागेवर आश्रम बांधावा असा प्रस्ताव मी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यासमोर ठेवला आहे. त्यांनाही तो प्रकल्प आवडला आहे. याबद्दल माझ्याकडे सर्व प्लॅन तयार असून त्याबद्दल निर्णय घेतले जातील.''

केवळ चित्रपट महामंडळच नव्हे, तर सिंटा म्हणजे सिने अॅण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशन यांच्या संघटनेलाही त्यांनी एक एकर जागा दिली होती. सिंटाचे गोखले हे अध्यक्ष होते.  एवढेच नाही देशाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता आपल्या कमाईतील काही भाग नित्यनेमाने भारतीय सैन्य दलाला मदत म्हणून देत असत. आता विक्रम गोखले यांच्या जाण्याने उत्तम नटासोबतच एका दानशूर कलाकारालाही सिनेसृष्टी मुकली आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ  व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Bollywood actor, Entertainment, Marathi entertainment