मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

हे तर रामायणाचं इस्लामीकरण! ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाला कायदेशीर नोटीस

हे तर रामायणाचं इस्लामीकरण! ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाला कायदेशीर नोटीस

आदिपुरुष

आदिपुरुष

अभिनेता प्रभास आणि सैफ अली खान यांचा सर्वांत लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये समावेश होतो. जगभरात त्यांचे कोट्वधी चाहते आहेत. मात्र, याच लोकप्रिय अभिनेत्यांना सध्या जोरदार टीकेचा सामना करावा लागत आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 7 ऑक्टोबर : अभिनेता प्रभास आणि सैफ अली खान यांचा सर्वांत लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये समावेश होतो. जगभरात त्यांचे कोट्वधी चाहते आहेत. मात्र, याच लोकप्रिय अभिनेत्यांना सध्या जोरदार टीकेचा सामना करावा लागत आहे. दोघांनी रामायणातील पात्रांवर आधारित 'आदिपुरुष' या चित्रपटात काम केलं आहे. प्रभास, सैफ अली खान आणि कृती सेनन स्टारर आदिपुरुष हा चित्रपट टीझर लाँचपासून जोरदार चर्चेत आला आहे. या चित्रपटात हिंदू धर्माची खिल्ली उडवल्याचा आरोप दिग्दर्शक आणि कलाकारांवर होत आहे. विशेषत: रावणाची भूमिका साकारणाऱ्या सैफ अली खानच्या लूकमुळे सर्वांत जास्त वाद सुरू आहे. त्याच्या लूकवर लोकांनी आक्षेप घेतला आहे. सर्व ब्राह्मण महासभेनं गुरुवारी चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. सात दिवसांत चित्रपटातील सर्व वादग्रस्त दृष्यं काढून टाकावीत, अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महासभेनं दिला आहे. टीव्ही 9 भारतवर्षनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

सर्व ब्राह्मण महासभेनं पाठवलेल्या नोटीसमध्ये दिग्दर्शक ओम राऊतला जाहीर माफी मागण्यास सांगण्यात आलं आहे. नोटिशीमध्ये म्हटलं आहे की, 'लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळू नका, अशी विनंती आहे. लोकांच्या धार्मिक भावना दुखवू नका. रामायण आणि रामचरितमानसमध्ये सांगितल्याप्रमाणं चित्रपट दाखवा. चित्रपटातील सर्व वादग्रस्त सीन सात दिवसांच्या आत हटवण्यात यावेत तसंच दिग्दर्शकानं जाहीरपणे लोकांची माफी मागावी. अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल.'

हेही वाचा -   भाजपाचा विरोध असलेल्या 'आदिपुरुष' ला मनसेचा पूर्ण पाठिंबा; राम कदमांवर साधला निशाणा

सर्व ब्राह्मण महासभेचे अध्यक्ष पंडित सुरेश मिश्रा यांनी आपले वकील कमलेश शर्मा यांच्याकरवी दिग्दर्शक ओम राऊतला ही नोटीस पाठवली आहे. या नोटिशीमध्ये लिहिलं आहे की, 'चित्रपटात हिंदू देवतांना चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आलं आहे. देव-देवतांना चामड्याचे कपडे घालून चुकीच्या पद्धतीनं बोलताना दाखवण्यात आलं आहे. चित्रपटात वापरण्यात आलेली भाषा अत्यंत खालच्या दर्जाची आहे. ज्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील. यातील काही संवाद जातीय आणि धार्मिक द्वेषाला खतपाणी घालणारे आहेत. याशिवाय, 'आदिपुरुष' चित्रपटामध्ये रामभक्त हनुमानाला मुघल व्यक्तीप्रमाणे दाखवलं आहे.'

'चित्रपटात हनुमानाला मिशीशिवाय दाढी लावलेली आहे. कोणती हिंदू व्यक्ती मिशीशिवाय दाढी ठेवते? हा चित्रपट रामायण, राम, सीता आणि हनुमान यांचं पूर्णपणे इस्लामीकरण करत आहे. रावणाची भूमिका करणारा अभिनेता सैफ अली खानही चित्रपटात तैमूर किंवा खिलजीसारखा दिसतो. हा चित्रपट देशातील लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळ करणारा आहे. चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या गोष्टी आपल्या समाजासाठी आणि देशासाठी अत्यंत घातक आहेत,' असंही या नोटीसमध्ये म्हटलं आहे.

सर्व ब्राह्मण महासभेनं पाठवलेल्या नोटीसला दिग्दर्शक ओम राऊत काय प्रतिक्रिया देतो, याकडे आता सर्वाचं लक्ष लागलेलं आहे.

First published:

Tags: Bollywood, Entertainment, Prabhas