मुंबई, 7 फेब्रुवारी: अनेक पिढ्यांचं आयुष्य ज्यांच्या स्वरांनी समृद्ध केलं आहे, त्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आता आपल्यात नाहीत, या बातमीने सगळा देश हेलावला आहे. सर्वत्र शोककळा पसरली आहे. ज्या मनोरंजनसृष्टीला लता मंगेशकर यांनी आपल्या मधुर आवाजानं यशाच्या शिखरावर नेलं, ती हिंदी मनोरंजनसृष्टीही (Bollywood) या धक्क्यानं सुन्न झाली आहे. अनेक दिग्गज कलाकार, गीतकार, संगीतकार लता मंगेशकर यांच्या आठवणीत हरवून गेले आहेत. ज्येष्ठ गीतकार गुलजारही (Gulzar) लता मंगेशकर यांच्या जाण्यानं अत्यंत दु:खी झाले असून, त्यांना मोठा धक्का बसला आहे. लता मंगेशकर यांनी गुलजार यांना नुकतीच भेटवस्तू (Gifts) पाठवली होती. गुलजार आणि लता मंगेशकर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत एकत्र खूप काम केलं आहे. गुलजार यांच्या अत्यंत संवेदनशील शब्दांना लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजानं जिवंत केलं आहे. या जोडीची एकापेक्षा एक गाणी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. गुलजार यांनी लता मंगेशकर यांच्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करताना अनेक आठवणींना उजाळा दिला. अलीकडेच लता मंगेशकर यांच्याशी झालेल्या एका भेटीची आठवण त्यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना सांगितली. ही आठवण संगाताना गुलजार अतिशय भावव्याकूळ झाले होते. गुलजार आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, कि ‘मला या क्षणी काय वाटत आहे ते मी सांगू शकत नाही. एका सुवर्ण युगाचा, शतकाचा अंत झाला आहे. तिचा आवाज कायमचा शांत झाला आहे. मला खूप दु:ख होत आहे. माझं आणि लताजींचं नातं खूप सुंदर होतं, खूप घनिष्ठ होतं. मी त्यांना बेगम म्हणून हाक मारायचो.’ ‘लता मंगेशकर यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. माझ्या मते, हा त्यांचा मोठा सन्मान आहे. शेवटी, त्या जादुई आवाजाच्या धनी होत्या. जोपर्यंत देशात गाणं आहे तोपर्यंत त्या कायम जिवंत असतील,’ असंही गुलजार यांनी सांगितलं. शाहरुख खानने लतादीदींच्या अंत्यदर्शनावेळी फुंकर मारण्यामागे इस्लामिक परंपरा गौतम बुद्धांची मूर्ती भेट लता मंगेशकर यांनी गुलजार यांना नुकतीच भेटवस्तू (Gifts) पाठवली होती. ती आठवण सांगताना गुलजार म्हणाले, ‘लता मंगेशकर यांना इतरांना भेटवस्तू द्यायला खूप आवडायचं. इतर दिग्गज गायकांच्या तुलनेत लताजी खूप हळव्या मनाच्या होत्या. आम्ही एक चित्रपट (Films) बनवला होता, तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो, कि तुम्ही एक कमालीच्या निर्मात्या आहात. त्या सेटवर यायच्या तेव्हा सगळ्यांना काही ना काही भेटवस्तू द्यायच्या. मी गौतम बुद्धांच्या मूर्तींचा (Budhha Statue) संग्रह करतो, हे त्यांना माहीत होतं. म्हणून त्यांनी माझ्यासाठी गौतम बुद्धांची एक मूर्ती आणली. यापूर्वीही त्यांनी मला अशा चार ते पाच मूर्ती दिल्या आहेत. 6 महिन्यांपूर्वीदेखील त्यांनी मला गौतम बुद्धांची एक मूर्ती भेट दिली होती.’ लता मंगेशकर यांच्या निधनानं देशातच नव्हे तर जगभरातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जगभरातले त्यांचे चाहते, देश-विदेशांतले राजकीय नेते शोकसंदेश पाठवत आहेत. केंद्र सरकारनं (Indian Government) ही दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून, राष्ट्रध्वजही अर्ध्यावर आणण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.