जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: जन्मस्थळ इंदूरवर नाराज होत्या लता दीदी, BJP नेत्याचा आश्चर्यकारक खुलासा

VIDEO: जन्मस्थळ इंदूरवर नाराज होत्या लता दीदी, BJP नेत्याचा आश्चर्यकारक खुलासा

 'लता मंगेशकर यांच्या स्मारकाचा वाद चालू आहे. आम्ही कधीच मंगेशकर कुटुंबीयांनी या वादात भाग घेतला नाही. उलट आमची तशी इच्छाच नाही'

'लता मंगेशकर यांच्या स्मारकाचा वाद चालू आहे. आम्ही कधीच मंगेशकर कुटुंबीयांनी या वादात भाग घेतला नाही. उलट आमची तशी इच्छाच नाही'

‘मला एका गोष्टीचं खूप वाईट वाटतं, लताजींनी इंदूरला यावं, अशी माझी खूप इच्छा होती. परंतु ती पूर्ण नाही झाली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 फेब्रुवारी-  इंदूरचे माजी महापौर (Indore Former Mayor), भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय (Kailash Vijayvargiy)  यांनी काल लाभ मंडपम येथे लताजींना आदरांजली वाहण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी लताजी इंदूरवर नाराज असल्याचं सांगून सर्वांना आश्चर्यचकित केलं. नुकतंच लता दीदी आपल्याला सोडून गेल्या. परंतु त्यांच्या कार्याच्या माध्यमातून त्या नेहमीच आपल्यात राहतील. सर्व लोक दीदींना आदरांजली वाहात आहेत. लता दीदींचं जनस्थळ असणाऱ्या मध्य प्रदेशमधील इंदूर या ठिकाणीसुद्धा दीदींना आदरांजली दिली जात आहे. नुकतंच इंदूरचे माजी महापौर, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी दीदींना आदरांजली देण्यासाठी एका सभेचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, ‘मला एका गोष्टीचं खूप वाईट वाटतं, लताजींनी इंदूरला यावं, अशी माझी खूप इच्छा होती. परंतु ती पूर्ण नाही झाली.

जाहिरात

ते पुढे म्हणाले, ‘मी महापौर असताना गेलेलोसुद्धा. दुर्दैवाने ही इच्छा अपूर्ण राहिली. मला आयुष्यात नेहमीच पश्चाताप राहील की ती सरस्वती,जिला गानकोकिळा म्हटलं जात होतं. ज्या जागतिक दर्जाच्या गायिका होत्या.ज्यांचा जन्म इंदूरमध्ये झाला होता. परंतु त्या इंदूरवरच नाराज होत्या. दीदींना इंदूरला येण्याचा राग का आला होता ते अखेर कळलं नाही’.

‘त्या इंदूरला येणं नेहमी टाळायच्या. मला भय्यू महाराजांनी सांगितलं होतं की, मी लताजींना इंदूरला घेऊन येईन. भय्यू महाराज निघून गेले, त्यानंतर लताजीही निघून गेल्या. आम्ही इंदूरचे लोक त्यांना पाहण्यासाठी तळमळत होतो. त्याचवेळी नारायण बागेत राहणार्‍या लता मंगेशकर यांच्या नातेवाईक कविता प्रगत यांनीही पुनरुच्चार करत म्हटलं की ‘लताजी इंदूरवर रागावल्या होत्या. त्यामुळे 1983 नंतर कोणताही कार्यक्रम करण्यासाठी त्या इंदूरला आल्या नाहीत. शेवटी, अशी कोणती घटना घडली ज्यामुळे लताजींना इंदूरचा राग आला होता’. हे एक गुपितच आहे. लता मंगेशकर तब्बल 28 दिवस मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होत्या. यादरम्यान त्यांना अनेकदा जनरल वॉर्ड आणि आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी त्यांना आयसीयूमधून बाहेर काढण्यात आलं होतं. परंतु आदल्या दिवशी त्यांची प्रकृती चिंताजनक वाटू लागल्यानं त्यांना पुन्हा लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलं होतं.परंतु त्यांची ही झुंज अपयशी ठरली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात