मुंबई, 13 जुलै : मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता अरविंद कुमार यांचं निधन झालं आहे. त्यांनी अनेक मालिकांमधून छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या असल्या तरी त्यांची सब टीव्हीच्या लोकप्रिय शो ‘लापतागंज’ मध्ये चौरसियाची भूमिका प्रसिद्ध आहे. 10 जुलै रोजी हृदयविकाराच्या झटक्याने या अभिनेत्याचे निधन झाले आहे. वृत्तानुसार, अभिनेता शूटिंगसाठी जात असताना त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, तोपर्यंत त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. ही दु:खद बातमी अभिनेता विनोद गोस्वामी यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केली आहे. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना आणि जवळच्यांना मोठा धक्का बसला आहे. अरविंद कुमार यांच्या निधनाची बातमी देताना विनोद गोस्वामी यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर ‘अत्यंत दु:खद बातमी, आमचे चांगले मित्र अरविंद जी आता आमच्यात नाहीत, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.’ असं म्हणत भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या निधनाची बातमी कळताच मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जातेय.
लापतागंजमध्ये एलिझाची भूमिका करणाऱ्या कृष्णा भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद 10 जुलै रोजी सकाळी नायगावमध्ये एका प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी निघाले होते. त्यांना रस्त्यातच हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिथेच त्यांचं निधन झालं. स्टारकिड्स विषयीचं ते वक्तव्य भोवलं; विवेक ओबेरॉयच्या वडिलांना ‘या’ सिनेमातून रातोरात काढलेलं बाहेर लापतागंज ही मालिका SAB TV वर ऑक्टोबर 2009 ते 15 ऑगस्ट 2014 पर्यंत प्रसारित झाली. ही मालिका घराघरात लोकप्रिय झाली होती. त्यात अरविंद कुमार यांनी चौरसियाची भूमिका साकारली होती. अरविंद कुमार यांनी 2004 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. सब टीव्हीच्या दैनिक शो लपतागंजमध्ये त्यांनी जवळजवळ 5 वर्षे चौरसिया ही भूमिका साकारली. याशिवाय तो क्राइम पेट्रोल, सावध इंडिया यांसारख्या शोमध्येही छोट्या मोठ्या भूमिकांमध्ये दिसला होता. यासोबतच त्यांनी चीनी कम, अंडरट्रायल, रामा राम क्या है ड्रामा, मॅडम मुख्यमंत्री यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले.