मराठीतील स्मॉर्ट आणि कुल अभिनेता ललित प्रभाकर लवकरच त्याचा 'मीडियम स्पायसी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे.
मीडियम स्पायसी हा सिनेमा येत्या 17 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमात ललित एका शेफची भूमिका साकारणार आहे. ज्याच नाव निस्सिम असं असणार आहे.
किचनमध्ये शेफच्या वेशात जेवण बनवणाऱ्या ललितला पाहून त्याचे फॅन भलतेच खुश झाले असून ललितच्या नव्या लुकवरही सगळे फिदा झाले.