मुंबई 4 एप्रिल: कोरोना विषाणूचं (COVID 19) संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) राम सेतू (Ram Setu) या चित्रपटातील तब्बल 45 कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
अक्षयचा राम सेतू हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अलिकडेच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. मात्र तेवढ्यात अक्षयला कोरोनाची लागण झाली. त्यामुळं चित्रीकरण थांबवून सेटवरील सर्वांची कोरोना चाचणी घेण्यात आली. लक्षवेधी बाब म्हणजे या चाचणीत तब्बल 45 कलाकारांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या बाबमीमुळं बॉलिवूड सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. शिवाय कोरोनामुळं रामसेतूचं चित्रीकरण काही महिन्यांसाठी स्थगित करण्यात आलं आहे. अक्षय कुमारनं ट्विटच्या माध्यमातून कोरोना झाल्याची माहिती दिली होती. “माझी तब्येत स्थिर आहे, कोणीही काळजी करु नये” अशी विनंती त्यानं आपल्या चाहत्यांना केली आहे. शिवाय “कोरोनापासून सावध राहा, घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घ्या.” असा सल्लाही त्यानं दिला.
अवश्य पाहा - ‘राजकारणासाठी चित्रपट सोडण्यास तयार’; कमल हासन यांची मोठी घोषणा
— Akshay Kumar (@akshaykumar) April 5, 2021
महाराष्ट्रातील कोरोनास्थिती चिंताजनक
महाराष्ट्रात कोरोनाच्या वेगाने होणाऱ्या दैनंदिन रुग्णवाढीबाबत गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली. राज्यातील परिस्थिती गंभीर बनू लागली असून तातडीने नमुना चाचण्या वाढवण्याची गरज आहे. कोरोनाचे संकट टळलेले नसून कोणताही निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो, हे महाराष्ट्रातील स्थितीवरून स्पष्ट होते. त्यामुळे अन्य राज्यांनीही दक्ष राहावे, असा इशारा निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के. पॉल यांनी दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.