जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'मैत्रीची ही पॉलिसी अशीच बहरत राहू दे'; वाढदिवसानिमित्त कुशल बद्रिकेची दोस्तासाठी खास पोस्ट

'मैत्रीची ही पॉलिसी अशीच बहरत राहू दे'; वाढदिवसानिमित्त कुशल बद्रिकेची दोस्तासाठी खास पोस्ट

kushal badrike

kushal badrike

कुशल बद्रिकेनं त्याच्या खास मित्रासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. वाढदिवसाचं औचित्य साधत कुशलनं आयुष्यात असलेली मित्राची जागा काय आहे हे सांगितलं आहे. पाहा POST

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 26 जुलै : आपल्या विनोदी शैलीनं लाखो प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके (Kushal Badrike). कुशल त्याच्या विनोदी शैलीनं हटके स्टाईलनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. कुशलच्या प्रत्येक भूमिकेला, कॉमेडीला चाहते दाद देताना दिसतात. कुशल सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चाहत्यांशी संवाद साधत असतो. त्यामुळे तो सोशल माध्यमांवर सतत सक्रिय असलेला दिसतो. अशातच कुशलनं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. कुशल बद्रिकेनं त्याचा खास मित्र प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता विजू मानेसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. विजू मानेच्या वाढदिवसाचं औचित्य साधत कुशलनं त्याच्या आयुष्यात असलेलं विजू मानेचं महत्त्व स्पष्ट केलं आहे. मी लिहिलेल्या ओळींमध्ये ज्यांना कधीच “गाणं” दिसत नाही, पण त्या ओळींची आज ना उद्या एखादी “कविता” होईल प्रयत्न करत रहा कुश्या ! असं कायम प्रोत्साहन देणाऱ्या मित्राचा आज बर्थडे, असं म्हणत कुशलनं विजू मानेसाठी एक सुंदर पोस्ट लिहित फोटो शेअर केले आहेत. हेही वाचा -  Sayali Sanjeev : राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर सायलीनं पहिल्यांदाच बाबांसाठी शेअर केली खास पोस्ट, म्हणाली… मी घर घेण्यापासून, ते घरातला बल्प गेलाय तो बदलून द्या पर्यंत, आणि “सिनेमाच्या प्रीमियरला” घालायला कपडे घेऊन द्या, पासून ते कपडे दिलेत! आता मला घेऊन “सिनेमा” करा आणि त्याचा " प्रीमियर" करा पर्यंत मी ज्यांच्याकडे काहीही मागू शकतो, अशी एक हक्काची जागा म्हणजे “विजू माने”, असं म्हणत कुशलनं विजू मानेची त्याच्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे हे लिहिलं आहे.

जाहिरात

कुशलनं पुढे म्हटलं की, कधी कधी तर मला वाटतं “विजू माने” उर्फ “विमा” देवाने हा माझ्या आयुष्यभराचा “विमा” आधी काढला मग मला जन्माला घातलं. फक्त “प्रेमाचं” प्रिमियम मात्र कमी पडू द्यायचं नाही. आपल्या मैत्रीची ही पॉलिसी अशीच बहरत राहू दे, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. हिच बाप्पांच्या आणि गुरूजींच्या चरणी प्रार्थना. कुशलनं विजू मानेला वाढदिवसाचं गिफ्ट देण्याविषयीही एक खास टीपणी केली आहे. ‘आज तुमच्या वाढदिवसानिमित्त कविता करत नाही हेच बर्थडे गिफ्ट समजा’, असं कुशलनं म्हटलं. विजू आणि कुशल दोघेही अनेकदा एकमेकांसोबत खास पोस्ट शेअर करताना दिसतात. दोघांचंही एक घट्ट नातं असल्याचं वारंवा दिसून येत. आणि आज पुन्हा एकदा या पोस्टमधून ते पहायला मिळालंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात