मुंबई 9 जुलै: चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) कार्यक्रमात दर आठवड्याला काहीतरी भन्नाट स्किट बघायला मिळत असतात. या कार्यक्रमातले विनोदवीर हास्याचे बार कायमच उडवताना दिसतात. कुशल बद्रिके (Kushal Badrike) हा याच फळीतला एक अफलातून नट आहे. कुशलची अनेकदिवसांपासूनची एक अपूर्ण इच्छा पूर्ण झाल्याचं त्याच्या नव्या इन्स्टाग्राम पोस्टवरून समजत आहे. कुशल शोषलं मीडियावर खूप ऍक्टिव्ह(Kushal Badrike instagram) असतो. हवा येऊ द्या कार्यक्रमातले अनेक bts क्षण तो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतो. या कार्यक्रमात येत्या आठवड्यात ‘तमाशा live’ सिनेमाची संपूर्ण टीम येणार आहे. या सिनेमातील मुख्य भूमिकेसोबत म्हणजेच महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुल्कर्णीसोबत त्याला अनेकदिवस डान्स करायची इच्छा होती. ती एका स्किटच्या निमित्ताने पूर्ण होताना दिसत आहे. कुशलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये डिजिटल स्वरूपात तो सोनालीसोबत एक रोमँटिक डान्स करताना दिसत आहे. हातात गिटार घेऊन, सुंदर पोज देत हे दोघे नृत्य करताना दिसत आहेत. या व्हिडिओला कॅप्शन देत कुशल असं लिहितो, “सोनाली कुलकर्णी” बरोबर फुल स्क्रीन वर नाचण्याची माझी “पांडू” या सिनेमा पासुन ची इच्छा होती फायनली ती पूर्ण झाली बाबा एकदाची. “हवा येऊ द्या” च्या या भागात आमच्या सोबत आहे “तमाशा live” सिनेमाची टीम. टीम कसली “झुंडच” म्हणा.” हे ही वाचा- Amruta Dhongade: ‘मी या गोष्टी घेऊन फसले’; पाहा अमृताचा शॉपिंग डिझास्टर! “कुशल सोनालीसोबत व स्क्रीन रोमान्स करताना दिसतो तर रिऍलिटी मध्ये एक वेगळीच व्यक्ती त्याच्यासमोर येते तेव्हा कुशल म्हणतो, “हे अजिबात बरोबर नाही. हे काये? स्क्रीनवर तुम्ही एकदम पोस्टर गर्ल देता आणि खऱ्या आयुष्यात पावसाळ्यात पत्रा झाकायचं बॅनर?” असं म्हणून कुशल जमलेल्या पाहुण्यांकडून दाद मिळवताना दिसत आहे. या स्किटमध्ये एक खास संजय जाधव सुद्धा पाहायला मिळणार आहेत.
चला हवा येऊ द्या ची टीम नेहमीच असे भन्नाट ऍक्ट घेऊन येत असते. ऍक्शन असो किंवा सिरीयल सिनेमा त्याच्यातून नेमका विनोद कसा काढायचा हे या टीमला नेमकं माहित आहे असं अनेक चाहत्यांचं म्हणणं आहे. कुशलच्या या व्हिडिओवर सुद्धा त्याला खूप सुंदर कमेंट्स आल्या आहेत.