मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Kushal Badrike: कुशलची एनर्जी बघून पाहुणे पण म्हणाले अरे बाबा थांब; पाहा हा जबरदस्त VIDEO

Kushal Badrike: कुशलची एनर्जी बघून पाहुणे पण म्हणाले अरे बाबा थांब; पाहा हा जबरदस्त VIDEO

कुशल बद्रिके सध्या त्याच्या एका नव्या व्हिडिओमुळे बराच चर्चेत आला आहे. त्याच्या अभिनयाचं आणि एनर्जीच कौतुक होत आहे.

कुशल बद्रिके सध्या त्याच्या एका नव्या व्हिडिओमुळे बराच चर्चेत आला आहे. त्याच्या अभिनयाचं आणि एनर्जीच कौतुक होत आहे.

कुशल बद्रिके सध्या त्याच्या एका नव्या व्हिडिओमुळे बराच चर्चेत आला आहे. त्याच्या अभिनयाचं आणि एनर्जीच कौतुक होत आहे.

  मुंबई 13 ऑगस्ट: चला हवा येऊ द्या हा सध्याचा आघाडीचा विनोदी कार्यक्रम आहे. यामध्ये दर आठवड्याला होणारी स्किट्स हा चर्चेचा विषय आहेच सोबतच कलाकारांची भन्नाट ऍक्टिंग आणि एनर्जी याने कार्यक्रमाला चार चांद लागतात. सध्या या कार्यक्रमतातील एक विनोदवीर कुशल बद्रिकेचा एक व्हिडिओ तुफान viral होतोय. यामध्ये त्याचे विनोद आणि मुख्यतः त्याची एनर्जी बघून आलेल्या पाहुण्यांना सुद्धा हसू आवरलं नाहीये. येत्या काळात या मंचावर दगडी चाळ 2 आणि झी मराठीवरील तू चाल पुढं मालिकेची टीम येणार असल्याचं समोर आलं आहे. यावेळी कुशल अंकुश चौधरीच्या येण्याने भलताच आनंदात असल्याचं दिसून येत आहे. त्याने अंकुशच्या उल्लेख कॅप्शनमध्ये करत लिहिलं, “मराठी सिनेमाचा superstar ⭐️ अंकुश चौधरी (दादा) “दगडी चाळ -२” हा सिनेमा घेऊन आमच्या थुकरट वाडीत आला. आणि आमचा अख्खा set Positivity ने भरून गेला. Team दगडी चाळ -२ तुम्हाला आमच्या कडून खुप शुभेच्छा . @ankushpchaudhari @zeemarathiofficial #chalahawayeudya” त्याने सादर केलेला शत्रुघ्न सिन्हा तर भाव खाऊन गेलाच पण त्याने आलेल्या पाहुण्यांना इतकं खळखळून हसवलं की त्यांना सुद्धा ‘अरे बाबा एक मिनिट थांब’ असं म्हणायची वेळ आली आहे. अगदी जबडा आणि गाळ दुखेपर्यंत कुशलने सगळ्यांना हसवल्याचं दिसून आलं आहे. खुद्द मकरंद देशपांडे आणि स्वप्नील जोशी यांनी कुशलला थांब असं सांगितलं. त्याला दाद देण्यासाठी टाळ्यांचा कडकडाट झाल्याचं सुद्धा व्हिडिओमध्ये दिसत आहे. अंकुश चौधरी सुद्धा खुल्या मनाने त्याला दाद देताना दिसत आहे. अनेक प्रेक्षकांनी उठून कुशलसाठी टाळ्या वाजवल्याचं दिसत आहे.
  चला हवा येऊ द्या कार्यक्रमात नेहमीच असे भन्नाट स्किट सादर होत असतात. दरवेळी कलाकार अत्यंत मेहनत घेऊन एक एक पात्र साकारताना दिसत असतात. कुशल भाऊ श्रेया आणि सगळीच विनोदवीरांची फळी एकदम दमदार बॅटिंग करताना दिसतात. सध्या कुशलने शेअर केलेला हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. कमेंट सेक्शनमध्ये देखील त्याच्या तुफान एनर्जीबद्दल चर्चा होताना दिसत आहे.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Chala hawa yeu dya, Marathi entertainment, Zee Marathi

  पुढील बातम्या