मुंबई,14 ऑक्टोबर- टीव्हीवरील(Tv Show) सर्वात दीर्घकाळ चालणाऱ्या मालिकांमध्ये 'कुमकुम भाग्य' आणि 'कुंडली भाग्य'(Kundali Bhagya) चा समावेश होतो. या मालिकांमध्ये सरला (Sarala) अरोडा ही आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे सुप्रिया शुक्ला(Supriya Shukla) होय. या भूमिकेमुळे सुप्रिया यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. त्यांची भूमिका मोठ्या प्रमाणात पसंत केली जाते. मात्र सुप्रिया यांनी मालिकेच्या ८ वर्षांनंतर एक मोठा निर्णय घेतला आहे. सुप्रिया यांनी मालिका सोडण्याचा निर्णय घेत शो मेकर्ससोबत सर्वांनाच धक्का दिला आहे.
View this post on Instagram
सुप्रिया शुक्ला यांनी तब्बल ८ वर्षे 'कुमकुम भाग्य' आणि त्यांनतर 'कुंडली भाग्य'मध्ये आईची भूमिका साकारली आहे. सरला अरोडा ही त्यांची भूमिका सर्वानांच आपलीशी वाटत होती. मात्र आता त्यांनी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसह सर्वानाच आश्चर्य वाटत आहे. सुप्रिया यांनी नुकताच ई टाइम्सला दिलेल्या मुलाखती मालिया सोडण्याचं आपलं कारण स्पष्ट केलं आहे.
(हे वाचा:कपिल शर्मा ते श्वेता तिवारी 'Luxury Homes'चे मालक आहेत हे प्रसिद्ध कलाकार)
काय आहे मालिका सोडण्याचं कारण-
'सरला' ही त्यांची भूमिका आज घराघरात पोहोचली आहे. लोकांना हि भूमिका आपलीशी वाटते. त्यामुळे चाहते त्यांना अफाट प्रेम देतात. मात्र त्यांनी आता मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, 'मी हा निर्णय माझ्या कुटुंबासाठी घेतला आहे. मला माझ्या कुटुंबाला आता वेळ द्यायचा आहे. लॉकडाऊन दरम्यान मी माझ्या कुटुंबासोबत बाहेर पाऊलही ठेवलं नाहीय. मात्र मला आता त्यांच्यासोबत कॉलिटि टाईम स्पेंड करायचा आहे. मला त्यांना पुरेपूर वेळ द्यायचा आहे. त्यांच्यासोबत काही तरी नवीन ट्राय करायचं आहे. म्हणून मी 'कुंडली भाग्य'मधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मी २ मालिका करत आहे त्यातील एक मोल्क्की आणि दुसरी 'कुंडली भाग्य'. या दोन्ही शुटिंग्समधून मला घरी वेळ देणं शक्य नाही. त्यामुळे मी कुंडली भाग्यमधून ब्रेक घेत आहे.
(हे वाचा:Bigg Boss 15: 'बिग बॉस' फेम तेजस्वी प्रकाश रियल लाईफमध्ये आहे फारच ग्लॅमरस)
इमोशनल सीनसाठी कधीच वापरलं नाही ग्लिसरीन-
'कुमकुम भाग्य'मध्ये प्रज्ञा आणि बुलबुलची आई आणि त्यांनतर 'कुंडली भाग्य'मध्ये प्रीता आणि सृष्टीची आई म्हणजेच 'सरला' ची भूमिका साकारत सुप्रिया यांनी रसिक प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. अतिशय हळव्या, भावुक आणि सहनशील आईची भूमिका त्यांनी साकारली आहे. मालिकेत अनेक इमोशनल सीन दिले आहेत. मात्र प्रत्येक सीन आपण मनापासून दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी कोणत्याही इमोशनल सीनसाठी आपण ग्लिसरीन 'न' वापरल्याचं म्हटलं आहे. त्या स्वतः सीननांतर रडत असल्याचंही तिन्ही म्हटलं आहे. तसेच भविष्यात गरज वाटली तर आपण मालिकेत परत येऊ शकतो असं त्यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Tv shows, Zee media