जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 150 किलो वजन कसं उचलाल? अभिनेता करतोय मार्गदर्शन, पाहा हा VIDEO

150 किलो वजन कसं उचलाल? अभिनेता करतोय मार्गदर्शन, पाहा हा VIDEO

150 किलो वजन कसं उचलाल? अभिनेता करतोय मार्गदर्शन, पाहा हा VIDEO

व्यायामप्रेमींना अभिनेता कुणाल खेमु (Kunal Khemu) यानं काही खास टीप दिल्या आहेत. तुम्हाला जर योग्य प्रकारे वेट लिफ्टिंग करणं शिकायचं असेल तर हा व्हिडीओ पाहा. (Viral Video)

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 24 फेब्रुवारी : शरीर तंदुरुस्त ठेवायचं असेल तर योग्य आहार आणि व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु व्यायाम देखील योग्य पद्धतीनंच करायला हवा. अन्यथा अधिक वजन उचलण्याच्या नादात मोठी दुखापत होण्याची शक्यता वाढते. अशा व्यायामप्रेमींना अभिनेता कुणाल खेमु (Kunal Khemu) यानं काही खास टीप दिल्या आहेत. तुम्हाला जर योग्य प्रकारे वेट लिफ्टिंग करणं शिकायचं असेल तर हा व्हिडीओ पाहा. (Viral Video) कुणाल हा बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जातो. एखादी व्यक्तिरेखा साकारण्यापूर्वी तो खूप खोलवर जाऊन त्याचा अभ्यास करतो. येत्या काळात तो एका अक्शन चित्रपटात झळकणार आहे. यासाठी तो तासंतास जिममध्ये घाम गाळत आहे. दरम्यान त्यानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. (how to lift weight at home) यामध्ये त्यानं 150 किलो वजन उचलायचं असेल कर कशी तयारी करावी याबाबत मार्गदर्शन केलं आहे.

जाहिरात

अवश्य पाहा -  उर्वशीला बॉलिवूड गायकानं घातली होती लग्नाची मागणी; का दिला अभिनेत्रीनं नकार? “तुम्ही किती किलो वजन उचलता यापेक्षा कसं उचलता याला महत्व आहे. जर थोडीशी चूक झाली तर तुम्हाला गंभीर दुखापत होऊ शकते. स्वत:ची क्षमता वाढवण्यासाठी दररोज थोडं थोडं वजन उचलावं. त्यानंतर कमी वजनावर अधिक सेट मारावे. एकदा का तुमच्या शरीराला त्या वजनाची सवय झाली की मग वजन वाढवावं. आता मी 150 किलो वजन उचलतोय पण गेले अनेक दिवस मी याची तयारी करत होतो.” अशा आशयाचा एक व्हिडीओ शेअर करुन कुणालनं आपल्या चाहत्यांना वेट लिफ्लिंगबाबत मार्गदर्शन केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात