Home /News /entertainment /

मल्लिका शेरावतमुळं बदललं अनुराग बासुचं आयुष्य; पाहा फ्लॉप दिग्दर्शक कसा झाला सुपरस्टार?

मल्लिका शेरावतमुळं बदललं अनुराग बासुचं आयुष्य; पाहा फ्लॉप दिग्दर्शक कसा झाला सुपरस्टार?

अनुरागचा आज वाढदिवस आहे. (Anurag Basu birthday) 50 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं पाहूया अनुरागच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या त्या प्रसंगाविषयी...

    मुंबई 8 मे: अनुराग बासु (Anurag Basu) हा बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. त्याचे चित्रपट आज तिकिटबारीवर अक्षरश: कमाल करताना दिसतात. त्याचे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. परंतु आज यशाच्या शिखरावर असलेल्या अनुरागवर याच बॉलिवूडनं कधीकाळी फ्लॉप दिग्दर्शकाचा स्टँप लावला होता. मात्र अभिनेत्री मल्लिका शेरावतमुळं (Mallika Sherawat) त्याच्या करिअरनं एकाएकी वळण घेतलं. अन् त्याला दिग्गज कलाकारांच्या पंक्तित स्थान मिळालं. अनुरागचा आज वाढदिवस आहे. (Anurag Basu birthday) 50 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं पाहूया अनुरागच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या त्या प्रसंगाविषयी... अनुरागचा जन्म बिहारमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. लहानपणापासून त्याला अभिनयाची आवड होती. परंतु घरखर्च चालवण्यासाठी त्याला नोकरीची गरज होती. त्यामुळं त्यानं इंजिनिअरिंग केली अन् नोकरी मिळवण्यासाठी मुंबईत आला. उत्तम शिक्षण असल्यामुळं मुंबईत त्याला नोकरी मिळाली. पण नोकरीत त्याचं मन रमेना त्यामुळं फावल्या वेळेत त्यानं रंगभूमीवरील प्रायोगिक नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. दिग्दर्शनात त्याला गती आहे हे लक्षात आल्यावर त्यानं चित्रपट कसा तयार करायचा हे शिकण्यासाठी FTI मध्ये प्रवेश घेतला. तेथून बाहेर आल्यावर त्यानं काही शॉर्टफिल्मची निर्मिती केली. अन् या फिल्मच्या जोरावर त्याला 1996 साली ‘तारा’ या मालिकेचं दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यानं ‘क्योकी सास भी कभी बहु थी’, ‘सस्पेन्स’, ‘अजिब दास्ता’, ‘कोशीश’, ‘रुह’ यांसारख्या काही मालिकांचं दिग्दर्शन केलं. यापैकी काही मालिका चालल्या अन् काही फ्लॉप झाल्या. मालिकेंमुळं त्याला पैसे मिळत होते पण कमाचं समाधान नाही. त्यामुळं त्यानं चित्रपटांना दिग्दर्शित करण्याचा प्रयत्न केला. अन् इथूनच त्याचा खऱा संघर्ष सुरु झाला. बॉलिवूडमधील रोजंदार कामगारांना मोठा दिलासा, सलमान खान थेट बँक खात्यात पाठवणार पैसे 2003 साली त्यानं ‘कुछ तो है’ आणि ‘साया’ या दोन चित्रपटांची निर्मिती केली. पण हे दोन्ही चित्रपट फ्लॉप ठरले. यामुळं त्याच्यावर एका फ्लॉप दिग्दर्शकाचा स्टँप लावण्यात आला. त्याच्यावर कोणीही पैसे लावण्यात तयार नव्हतं. इतक्यात महेश भट्ट यांच्या मर्डर या चित्रपटासाठी दिग्दर्शकांच्या मुलाखती सुरु असल्याची चर्चा त्याच्या कानावर आली. त्यानं महेश भट्ट यांना भेटून एक संधी देण्याची विनंती केली. पण या चित्रपटासाठी योग्य अभिनेत्री शोधून आणण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली. जर तसं झालं तर हे काम मिळेल अशी जणू अटच घालण्यात आली होती. चित्रपटात किसिंग सीन भरमसाठ प्रमाणात असल्यामुळं त्यावेळी कुठलीच नामांकित अभिनेत्री इतकं धाडसी पाऊल उचलायला तयार नव्हती. इतक्यात त्याची भेट मल्लिका शेरावतशी झाली. मल्लिका देखील बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवण्यासाठी संघर्ष करत होती. तिनं थोडाफार विचार करुन या चित्रपटासाठी होकार दिला. अन् अनुरागनं देखील चित्रपटातील कुठलाही किसिंग सीन वल्गर वाटणार नाही याचं वचन तिला दिलं. अखेर त्यानं तो चित्रपट दिग्दर्शित केला. चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटानं विक्रमी कमाई केली. अशा प्रकारे अनुराग बासुच्या कपाळावरील प्लॉप दिग्दर्शकाचा स्टँप पुसला गेला. अनुरागनं हा किस्सा टेडएक्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता. त्यानंतर त्यानं ‘लाईफ इन मेट्रो’, ‘गँगस्टर’, ‘बरफी’, ‘लुडो’ यांसारख्या काही सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bollywood, Bollywood actor

    पुढील बातम्या