• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • कंगनाचा इंदिरा गांधी चित्रपट फ्लॉप होणार, कारण; अभिनेत्यानं केली भविष्यवाणी

कंगनाचा इंदिरा गांधी चित्रपट फ्लॉप होणार, कारण; अभिनेत्यानं केली भविष्यवाणी

आणीबाणीवर आधारित मधुर भंडारकरचा चित्रपट नाही चालला तर तुझा काय चालणार? अशी खिल्ली त्यानं उडवली आहे.

 • Share this:
  मुंबई 27 जून: बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत (Kangana Ranaut) लवकरच एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा आगामी चित्रपट 1975 साली भारतात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीवर आधारित आहे. (Emergency in India) या चित्रपटात अभिनेत्री कंगना रणौत भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची भूमिका साकारणार आहे. यासाठी कंगनानं जोरदार तयारी देखील सुरु केली आहे. परंतु हा चित्रपट सुपरफ्लॉप होणार अशी भविष्यवाणी अभिनेता कमाल आर खान (KRK) यानं केली आहे. आणीबाणीवर आधारित मधुर भंडारकरचा चित्रपट नाही चालला तर तुझा काय चालणार? अशी खिल्ली त्यानं उडवली आहे. “मधुर भंडारकरने इंदु सरकार हा चित्रपट तयार केला होता. हा चित्रपट आणीबाणीवर आधारित होता. परंतु कोणी कुत्रं देखील तो चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेलं नाही. आता त्याच विषयावर कंगना रणौत चित्रपट तयार करणार आहे. तिचे सलग 11 चित्रपट फ्लॉप झाले अन् आता 12 व्या चित्रपटाची तयारी करत आहे. अशा आशयाचं ट्विट करुन केआरकेनं पुन्हा एकदा कंगनाला डिवचण्याचा प्रयत्न केला.” त्याच्या या ट्विटवर कंगनानं अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना नोकरांच्या भूमिका का देतात? अशोक सराफांनी सांगितलं सत्य रिल लाईफमध्ये अफूचा व्यवसाय करणारे कालिन भैया झाले NCB चे अँबेसिडर यापूर्वी पासपोर्ट प्रकरणावरुन केआरकेनं कंगनाची खिल्ली उडवली होती. “मी कंगना रणौत 12 वी नापास, समाजात द्वेष पसरवण्यात मी पीएचडी केली आहे. माला चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. असं असताना देखील तुम्ही माझा पासपोर्ट रिन्यू केला नाही? का तर माझ्यावर देशद्रोहाचा आरोप आहे म्हणून. हे पाहा मला देशाबाहेर शूटिंगला जायचं आहे. कारण मला पैसे देखील कमवायचे आहेत. तुम्ही बॉलिवूडच्या क्वीनचा राग अजून पाहिला नाहिये.” असं म्हणत केआरकेने व्हिडीओद्वारे कंगनाला डिवचण्याचा प्रयत्न केला होता.
  Published by:Mandar Gurav
  First published: