मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Koffee With Karan 7: 'मुलं झाल्यावर करीनाची सेक्स लाईफ कशी आहे?' उत्तर ऐकून करणची बोलती बंद, आमिर म्हणाला....

Koffee With Karan 7: 'मुलं झाल्यावर करीनाची सेक्स लाईफ कशी आहे?' उत्तर ऐकून करणची बोलती बंद, आमिर म्हणाला....

'कॉफी विथ करण 7'च्या पाचव्या एपिसोडचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमधून पुढचे गेस्ट सेलिब्रिटी अभिनेत्री करीना कपूर खान आणि अभिनेता आमिर खान असल्याचं समोर आलं आहे.

  • Published by:  Sayali Zarad
मुंबई, 2 ऑगस्ट: डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणारा लोकप्रिय शो म्हणजे 'कॉफी विथ करण'. नुकताच बहुप्रतिक्षित कॉफी विथ करणचा सातवा सीझन (Koffee With Karan Season 7) सुरु झाला आहे. या सीझनचे चार एपिसोड आत्तापर्यंत समोर आले आहेत. या चार एपिसोडमध्ये अनेक धमाल, मस्ती पहायला मिळाली. याशिवाय अनेक गुपितं देखील उघड झाली आहे. अनेक लोकप्रिय कलाकारांनी आत्तापर्यंत या सीझनला हजेरी लावली असून पुढच्या एपिसोडच्या कलाकारांची चर्चा सुरु आहे. अशातच पुढच्या एपिसोडचा म्हणजेच सीझन सातमधील पाचव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. 'कॉफी विथ करण 7'च्या पाचव्या एपिसोडचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमधून पुढचे गेस्ट सेलिब्रिटी अभिनेत्री करीना कपूर खान आणि अभिनेता आमिर खान असल्याचं समोर आलं आहे. प्रोमोमध्ये दिसतंय की, करणनं या एपिसोडमध्येही सेक्स लाईफ, मुलं असे अनेक प्रश्न विचारले पहायला मिळत आहे. त्यामुळे या एपिसोडमध्येही अनेक खुलासे, जबरदस्त मस्ती पहायला मिळणार आहे.
प्रोमोमध्ये करणने करीनाला मुलं झाल्यानंतर तिची सेक्स लाईफ कशी आहे, असा प्रश्न विचारला आहे. यावर करिनानंही करणनला सडेतोड उत्तर दिलेलं दिसतंय. 'करण तू ज्यावर आश्चर्यचकित होत आहेत, ती गोष्ट तुला कळणार नाही', असं करिनानं म्हणताच करणचीही बोलती बंद झाल्याचं दिलसं, तो म्हणाला की , माझी आई पण हा शो पाहतेय लक्षात ठेवा. यावर आमिर म्हणाला की, तू जेव्हा दुसऱ्यांना सेक्स लाईफविषयी प्रश्न विचारतो तेव्हा तुझी आई शो नाही पाहत का?. हे ऐकूण करण शांत बसला. हेही वाचा -  Dia Mirza वर कोसळला दुःखाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचं निधन, शेअर केली EMOTIONAL पोस्ट दरम्यान, 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटात आमिर खानसोबत करीना कपूरही दिसणार आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर हा चित्रपट रक्षाबंधनाला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यअगोदर वादात सापडल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग होत आहे.
First published:

Tags: Aamir khan, Bollywood, Karan Johar, Kareena Kapoor, Kareena kapoor baby

पुढील बातम्या