मुंबई, 22 सप्टेंबर- बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल ‘गदर’च्या सिक्वेलमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटाचं शूटिंग सुरु झालं आहे.मात्र अमिषा तिच्या चित्रपटापेक्षा जास्त तिच्या लेटेस्ट व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. अमीषाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अभिनेत्रीने स्वतः शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अमीषा पाकिस्तानी अभिनेता इम्रान अब्बाससोबत दिसून येत दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. अभिनेत्री अमिषा पटेलने बहरीनमधून तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अमिषा पटेल पाकिस्तानी अभिनेता इम्रान अब्बाससोबत ‘क्रांती’ चित्रपटातील ‘दिल में दर्द सा’ गाण्यावर परफॉर्म करताना दिसत आहे. हे दोघेही या रोमँटिक व्हिडीओमध्ये हिंदी गाण्यावर लिपसिंक करत आहेत . व्हिडीओमध्ये अमीषा आणि इम्रान दोघेही एकमेकांच्या खूप जवळ दिसत आहेत. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. हा रोमँटिक व्हिडिओ शेअर करताना अमिषा पटेलने कॅप्शनमध्ये लिहलंय, ‘माझा सुपरस्टार मित्र इम्रान अब्बाससोबत गेल्या आठवड्यात बहरीनमध्ये. ‘खरं तर माझ्या आणि बॉबी देओलच्या ‘क्रांती’ चित्रपटातील गाणं इम्रानच्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे. हा व्हिडीओ शेअर करताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ समोर येताच भलतीच चर्चा रंगली आहे. सध्या सोशल मीडियावर अमिषा आणि इम्रानमध्ये काहीतरी शिजत असल्याची चर्चा सुरु आहे. याआधीही इम्रान आपल्या अफेयर्समुळे चर्चेत आला होता. पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत तिचं नाव जोडलं जात होतं. परंतु अभिनेत्याने आपल्यात काही नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. त्यानंतर आता अमिषा पटेलमुळे इम्रान चर्चेत आला आहे.
(हे वाचा: Sana Saeed B’day: ‘कुछ कुछ होता है’ फेम अंजली आता दिसतेय अशी; बोल्डनेस पाहून तुम्हीही म्हणाल OMG **)** या व्हिडिओमध्ये अमिषा पटेल आणि इम्रान अब्बास यांच्या रोमँटिक जोडीचं चाहते कौतुक करत आहेत. तर इम्रान अब्बासने लिहलंय, ‘या व्हिडिओच्या रेकॉर्डिंगचा आनंद घेतला. हे गाणं तुमच्यावर चित्रित केलेल्या माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे. मी लवकरच तुम्हाला पुन्हा भेटण्यास उत्सुक आहे. हा व्हिडिओ आणि कमेंट्स वाचल्यानंतर चाहते अमिषा पटेल आणि इम्रान अब्बास यांच्यातील केमिस्ट्रीबद्दल चर्चा करताना दिसत आहेत.